Tecno Spark 20 Mobile :  Tecno चा नवा स्मार्टफोन Spark 20 भारतात (Tecno Spark 20) लाँच करण्यासाठी तयार झाला आहे. पुढील महिन्यात (Smartphone) भारतात लाँच केला जाऊ शकतो. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, आगामी टेक्नो स्मार्टफोनमध्ये 256 जीबी इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. हा एक बजेट स्मार्टफोन असेल. याची किंमत 10,000 रुपये आहे. 


Tecno Spark 20 फिचर्स


डिस्प्ले : Tecno Spark 20मध्ये 6.56  इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. यात 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह एलसीडी पॅनेल आहे.
प्रोसेसर : चांगल्या परफॉर्मन्ससाठी मोबाइलमध्ये MediaTek Helio G85 एंट्री लेव्हल प्रोसेसर देण्यात आला आहे, जो हाय परफॉर्मन्स आणि गेमिंगही करू शकतो.
रॅम आणि स्टोरेज : फोनमध्ये 8 जीबी रॅम + 265 जीबी ची मोठी स्टोरेज मिळते. इतकंच नाही तर रॅम वाढवण्यासाठी 8 जीबी एक्सटेंडेड रॅमचा ही सपोर्ट आहे.
कॅमेरा : कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 50  एमपी अल्ट्रा क्लिअर रिअर कॅमेरा आणि 32 एमपी फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत यात 5000 एमएएच बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
ओएस: अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत, टेक्नो स्पार्क 20 अँड्रॉइड 13 आधारित  HiOS 13 UI चालतो.


iQOO Neo 9 Pro लाँच होणार


 नवीन वर्षात सध्या  (Letest Phone)नवनवे फोन लाँच होणार आहे. त्यात IQ चा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणजे Neo 9 Pro या फोनचा समावेश आहे. हा फोन येत्या महिन्यात 22 फेब्रुवारीला लाँच होणार आहे. फोनमध्ये 120W फ्लॅश चार्ज सपोर्टसह 50W वायरलेस चार्जिंग आहे. फोनमध्ये 50MP GN5 gimbal कॅमेरा सेन्सर आणि 16MP पोर्ट्रेट कॅमेरा लेन्स असेल. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट सपोर्ट दिला जाईल.


IQ ने डिसेंबरच्या महिन्यामध्ये नियो 9 सीरीज अंतर्गत फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले असेल. तसेच 144Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. या स्मार्टफोनचा प्रोसेसर हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह मिळणार असेल. येवढंच नाही तर या फोनचे डेटा स्टोरेज 16GB पर्यंत LPDDR5X रॅम + 1 टीबी UFS4.0 इंटरनल स्टोरेज मध्ये येऊ शकते. कॅमेराचा विचार केला तर ड्युअल रिअर कॅमेरा OIS टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सलचा सोनी VCS IMX92 सेन्सर आणि 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.  हा फोन15  मिनिटांत 100 टक्के चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 5160mAh ची बॅटरी आणि 120वॉट फास्ट चार्ज होणारा हा स्मार्टफोन आहे


इतर महत्वाची बातमी-


Google Pixel 8: आता Smartphone करणार Thermometer चं काम! Google Pixel मध्ये नवे अपडेट्स; शरीराचे तापमान मोजण्यापासून ते सर्कल टू सर्च सारखे भन्नाट फिचर्स!33