iQOO Neo 9 Pro :  iQOO Neo 9 Pro गेल्या (IQOO) काही महिन्यांपासून भारतात या फोनची (Smartphone) बरीच चर्चा सुरू आहे. हा फोन आयक्यूओ निओ 7 प्रोचे अपग्रेड व्हर्जन असेल. हा फोन भारतात 22 फेब्रुवारीला लाँच होणार आहे, पण कंपनीने फोनच्या प्री-बुकिंग डिटेल्सची घोषणा केली आहे. कंपनीने या फोनच्या प्री-बुकिंगसोबत काही ऑफर्सही आणल्या आहेत. ते ऑफर्स नेमके कोणते आहेत? किंमत आणि फिचर्स कसे असतील? पाहूयात...


iQOO Neo 9 Pro  प्री-बुकिंग डिटेल्स


अॅमेझॉन आणि आयक्यूओच्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून युजर्स या फोनची प्री-बुकिंग करू शकतील. या स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोनची प्री-बुकिंग 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. युजर्स केवळ 1000 रुपये भरून अॅमेझॉन किंवा आयक्यूओच्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे या फोनची प्री-बुकिंग करू शकतात


या फोनचे प्री-बुकिंग करून युजर्सना काही फायदाही मिळणार आहे. कंपनीने प्री-बुकिंग बेनिफिट ्स म्हणून युजर्सना 1000 रुपयांची अतिरिक्त सूट, 2 वर्षांची वॉरंटी आणि काही एक्सक्लुझिव्ह लाँच ऑफर्स देण्यात येणार आहे. या लाँच ऑफर अंतर्गत युजर्संना इन्स्टंट बँक डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय आणि अतिरिक्त एक्सचेंज बोनस सारखे फायदे मिळू शकतात. 


कसं कराल प्री बुकींग?


-या फोनचे प्री-बुकिंग करण्यासाठी युजर्सला अॅमेझॉनवर लिस्ट केलेल्या फोनच्या प्रॉडक्ट पेजवर जाऊन प्री-बुक नाऊ बटणावर क्लिक करावे लागेल. 
-त्यानंतर युजर्स अॅमेझॉन पे वॉलेटचा वापर करून 1000 रुपये भरू शकतात आणि प्री-बुकिंग प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
-अॅमेझॉन पे वॉलेटमध्ये पैसे जोडण्यासाठी युजर्संना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय असे अनेक पर्याय मिळतील.
-भरलेले भर पूर्ण झाल्यानंतर युजर्सला प्री-बुकिंगचे कन्फर्मेशन नोटिफिकेशन मिळेल.


फिचर्स कसे असतील?


नियो 9 सीरीज अंतर्गत फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले असेल. तसेच 144Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. या स्मार्टफोनचा प्रोसेसर हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह मिळणार असेल. येवढंच नाही तर या फोनचे डेटा स्टोरेज 16GB पर्यंत LPDDR5X रॅम + 1 टीबी UFS4.0 इंटरनल स्टोरेज मध्ये येऊ शकते. कॅमेराचा विचार केला तर ड्युअल रिअर कॅमेरा OIS टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सलचा सोनी VCS IMX92 सेन्सर आणि 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो.  हा फोन15  मिनिटांत 100 टक्के चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 5160mAh ची बॅटरी आणि 120वॉट फास्ट चार्ज होणारा हा स्मार्टफोन आहे.


इतर महत्वाची बातमी-


iPhone Flip : आता अॅपल फोल्डेबल फोन, आयपॅड लॉंच करण्याच्या तयारीत; किती असेल किंमत?