Best Laptop Processor in 2024:  तुम्हीही बऱ्याच दिवसांपासून (Laptop) नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहात का? असाल तर लॅपटॉप किंवा पीसीसाठी चांगला प्रोसेसर निवडणे हे सर्वात (Best Laptop Processor)महत्वाचे काम आहे. जर तुम्ही योग्य प्रोसेसर ची निवड केली तर तुम्ही बराच काळ डिव्हाइस वापरू शकता. कोणताही लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी लॅपटॉपवर तुम्हाला करायच्या कामांची यादी बनवा, त्यानंतर तुमच्या गरजेनुसार काही पर्याय शॉर्टलिस्ट करा आणि मगच लॅपटॉप खरेदी करायला जा. चला तर मग जाणून घेऊया लॅपटॉपमध्ये बेस्ट प्रोसेसर कसा निवडावा?


प्रोसेसर कोणती जनरेशन आहे?


नवीन लॅपटॉप खरेदी करताना कोणत्या जनरेशन प्रोसेसरसोबत जायचं, हे सर्वात महत्वाचं ठरतं. अनेकदा असे दिसून आले आहे की काही लोक स्वस्त बाजारात जुन्या जनरेशनचा लॅपटॉप खरेदी करतात, जो कमी वेळात स्लो होतो. जर तुम्ही रोज हेवी टास्क करत असाल आणि गेमिंगचे वेडे असाल तर नेहमी लेटेस्ट जनरेशन प्रोसेसर असणारा लॅपटॉप घ्या. तथापि, जर आपण नियमित किंवा वैयक्तिक कामांसाठी लॅपटॉप शोधत असाल तर आपण आपल्या बजेटनुसार मागील पिढीच्या प्रोसेसरसह देखील जाऊ शकता.


प्रत्येक फिचरची टेस्टिंग


नवीन लॅपटॉप खरेदी करताना प्रोसेसरसह लॅपटॉप काय देत आहे हे तपासा, प्रत्येक फीचरचा वापर आणि महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे आपल्याला तुलना करण्यास आणि आपल्यासाठी योग्य लॅपटॉप शोधण्यात मदत करेल. जर भरपूर टेक्निकल काम करणार असाल तर एखाद्या एक्सपर्टला विचारुन लॅपटॉप खरेदी करा. जेणेकरुन तुम्हाला योग्य लॅपटॉप खरेदी करता येईल आणि महत्वाचं म्हणजे किंमतदेखील कमी होण्यास मदत होईल. 


GPU कसा असावा?


प्रोफेशनल किंवा गेमिंगसाठी लॅपटॉपच्या शोधात असाल तर लॅपटॉपचा GPUकसा आहे ते तपासून पहा. आपण नेहमीच ग्राफिक्स प्रोसेसरसह जावे. हे आपल्याला चांगल्या फिचर आणि आउटपुट देईल. त्यासोबतच सीपीयू कधीही जीपीयूची पूर्णपणे जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे सगळी माहिती घेऊनच लॅपटॉप खरेदी करा.   सध्या लॅपटॉपचे intel core I7 आणि rizon 7 हे दोन्ही प्रोसेसर चांगले आहे. तुम्हाला काम नेमकं कोणतं असणार आहे आणि बजेट किती आहे. यावर सगळं अवलंबून आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Google Circle to Search : Google सर्च इंट्रेस्टिंग होणार! स्क्रीनवर सर्कल काढताच मिळणार माहिती; सध्या दोन फोनसाठी फिचर उपलब्ध