Smartphone Export: स्मार्टफोनच्या बाबतीत देश स्वावलंबी झाला आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या सात महिन्यांतील स्मार्टफोनच्या निर्यातीचा डेटा शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 7 महिन्यांत भारतातील स्मार्टफोनच्या निर्यातीत 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशानं परदेशात सर्वाधिक आयफोन पाठवले आहेत. आयफोनच्या निर्यातीत 177 टक्क्यांची वाढ झाली आहे.
दर महिन्याला सरासरी एक अब्ज डॉलर्सचे मोबाईल फोन निर्यात
दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट याबाबत ट्वीट केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत एकूण 4.97 अब्ज डॉलर्सचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले आहेत. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दर महिन्याला सरासरी एक अब्ज डॉलर्सचे मोबाईल फोन निर्यात होत आहेत. उद्योग आणि सरकारी आकडेवारीनुसार, कंपनीने भारतातील तीन विक्रेत्यांमार्फत 1.8 अब्ज डॉलर किमतीचे आयफोन निर्यात केले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात भारतातून 5 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आहे. भारतातून स्मार्टफोनच्या निर्यातीत वार्षिक आधारावर 61 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
Apple भारतात उत्पादन वाढवले
सरकारच्या PLI योजनेंतर्गत Apple ने भारतात उत्पादन वाढवले आहे. त्यामुळे आयफोनचा बाजारातील हिस्सा लक्षणीय वाढला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत एकूण स्मार्टफोन निर्यातीत आयफोनचा वाटा सुमारे 62 टक्के राहिला आहे. यानंतर बाकीचे स्मार्टफोन येतात. गेल्या वर्षी, एकूण 5.8 अब्ज डॉलर किमतीचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले होते. यामध्ये 22 टक्के वाटा आयफोनचा आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, तैवानच्या कंपन्या फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि विस्टिऑन भारतात करारावर आयफोन तयार करतात. Visteon अलीकडेच Tata Electronics ने खरेदी केले आहे. iPhone 11, iPhone 12, iPhone 13, iPhone 14 आणि iPhone 15 भारतात तयार केले जातात. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने भारतात 7 टक्के आयफोन बनवले होते.