UPI Payment : तुमच्या व्यस्त दिनचर्येत आराम करण्यासाठी तुम्ही ऑफिसच्या वेळेत अनेकदा चहासाठी ब्रेक घेता. अशा वेळी अनेकवेळा तुम्ही ऑफिसच्या बाहेर चहाच्या टपरीवर चहा घेतला असेल. चहा घेतल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल काढता आणि QR कोड स्कॅन करून पेमेंट करता.


त्याचप्रमाणे, इतर अनेक ठिकाणी तुम्ही QR कोड स्कॅन करून पेमेंट करता. ज्यामध्ये पार्किंग शुल्क, टोल टॅक्स, किराणा माल आणि ऑनलाईन शॉपिंग यावेळी आपण जास्त करून यूपीआय पेमंटचा वापर करतो.  या सर्व पेमेंटसाठी तुम्ही तुमचा UPI मुख्य खात्याशी जोडला असल्यास, तुम्हाला फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. हे नेमकं कसं ते जाणून घ्या. 


UPI ला कोणत्या खात्याशी जोडायचे?


जर तुम्ही ऑनलाईन माध्यमातून बहुतांश पेमेंट करत असाल, तर तुम्ही यासाठी स्वतंत्र खाते ठेवावे. ज्यामध्ये रोजच्या खर्चानुसार पैसे ठेवावेत. या पर्यायी खात्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात.


फसवणुकीपासून सुरक्षित राहाल


तुम्ही UPI ला मुख्य खात्याऐवजी अल्टरनेट अकाऊंटशी जोडल्यास त्यात कमी पैसे शिल्लक राहतील. अशा परिस्थितीत जर तुमची फसवणूक झाली तर तुमच्या खात्यातून कमी पैसे काढले जातील आणि तुमचे नुकसान देखील कमी होईल.


बजेट ट्रॅक करण्यास सक्षम असेल


तुम्ही रोजच्या रोज पर्यायी खात्यात पैसे ठेवल्यास तुमचे बजेट योग्य राहील आणि तुमचे अनावश्यक खर्च कमी होतील. तसेच, आवश्यक असल्यास, तुम्ही सहजपणे आपल्या खर्चाचा हिशोब घेऊ शकता.


बचत खात्यावर व्याज मिळेल


पर्यायी खाते UPI शी कनेक्ट करून आणि त्यात दैनंदिन खर्चासाठी पैसे ट्रान्सफर केल्यास, तुम्हाला एक मोठा फायदा मिळेल की तुमच्या मुख्य खात्यात जास्त पैसे असतील. यामुळे तुम्हाला बँकेकडून वार्षिक आधारावर त्यावर 7 टक्के व्याज मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही मुख्य खात्याशी UPI कनेक्ट केले, तर तुम्हाला या फायद्यांच्या उलट अनेक तोट्यांचा सामना करावा लागेल.


महत्त्वाच्या बातम्या : 


Airtel News : Airtel ला टक्कर Jio चा मोफत प्लॅन; कॉलिंग आणि डेटावर मिळणार OTT सबस्क्रिप्शन