Redmi Note 13R Pro: Redmi Note 13R Pro लाँच करण्यात आला आहे. ज्यात 12 GB + 256 GB स्टोरेज मिळेल. या हँडसेटची डिझाइन रेडमी नोट 13 सारखीच आहे, जी चीनमध्ये यापूर्वीच लाँच करण्यात आली आहे. रेडमीच्या या फोनमध्ये 100 एमपी ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या हँडसेटमध्ये 5000 एमएएच ची बॅटरी आणि 33 वॉट फास्ट चार्जर आहे. अनेक भन्नाट फिचर्ससह कमी किमतीत हा फोन लाँच करण्यात आला आहे. 


शाओमीने नुकताच चीनमध्ये रेडमी नोट 13 सीरिज लाँच केली होती. हे मिड रेंजचे फोन आहेत.  या या फोनचं नाव Redmi Note 13R Pro आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये येणार आहे. ब्रँडिंगच्या नावाखाली POCO दिला जाऊ शकतो. Redmi Note 13R Proच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर तो सिंगल स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येतो. यात 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज आहे आणि याची किंमत 1999 चीनी युआन आहे, जी भारतात सुमारे 23,200 रुपये असेल. हा फोन मिडनाइट ब्लॅक, मॉर्निंग लाइट गोल्ड आणि टाइम ब्लू कलर या तीन कलरमध्ये येतो.


Redmi Note 13R Proचे स्पेसिफिकेशन्स


Redmi Note 13R Pro हा रेडमी नोट 12 आर चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. याचे डिझाइन रेडमी नोट 13 सारखेच आहे.
हा हँडसेट पातळ आणि हलक्या शरीरात येतो. या हँडसेटमध्ये 6.67 inch OLED स्क्रीन आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2400 × 1800 पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे.



Redmi Note 13R Pro प्रोसेसर आणि रॅम



Redmi Note 13R Pro MediaTek Dimensity 6080 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यात Mali-G57 MC2 GPU  आहे. या हँडसेटमध्ये 12 GB RAM आणि 256 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये 5000 mAH ची बॅटरी आहे, जी 33W  फास्ट चार्जिंगसोबत येते.


Redmi Note 13R Proचा कॅमेरा सेटअप कसा आहे?


Redmi Note 13R Proच्या कॅमेऱ्याबाबात बोलायचे झाले तर यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात प्रायमरी कॅमेरा 100 MP सेन्सर आहे, जो  f/1.7 अपर्चरसोबत येतो. यात 3 X सेन्सर झूम देण्यात आला आहे. सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.


इतर महत्वाची बातमी-


Huawei Mate 60 series : iphone ला टक्कर देणारा फोन, तरुणांमध्ये 'या' फोनची तुफान क्रेझ, काय आहेत स्पेशल फिचर्स? किंमत किती?