Poco X5: Poco लवकरच Poco X5 स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. पोकोचे कंट्री हेड हिमांशू टंडन यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन कधी लॉन्च होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी हा फोन लवकरच लॉन्च होणार असल्याचे हिमांशू टंडन यांनी निश्चितपणे सांगितले आहे. Poco X5 आधीच ग्लोबल स्तरावर लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन Poco X5 Pro 5G चे लाइट व्हर्जन असेल. Poco X5 Pro 5G स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 22,999 रुपये आणि टॉप एंड व्हेरिएंट 24,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे.
POCO X5 मध्ये मिळू शकतात हे फीचर्स
POCO X5 मध्ये ग्राहकांना 120hz च्या रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. स्मार्टफोनमध्ये स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 SoC वर काम करेल. POCO X5 भारतात सुमारे 20,000 रुपयांना लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजमध्ये लॉन्च करू शकते. POCO X5 मध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी मिळू शकते. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला यात ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यामध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा असेल. त्याचप्रमाणे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोर 13 मेगापिक्सेल कॅमेरा मिळू शकतो.
तुम्ही Google Pixel 6a स्वस्तात खरेदी करू शकता
Google Pixel 6a च्या 6GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे. परंतु तुम्ही एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन त्यावर 21,000 रुपये वाचवू शकता. याशिवाय ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 10% सूट दिली जात आहे. मोबाईल फोनमध्ये 6.1 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि 4410 mAh बॅटरी आहे.
Vivo ने लॉन्च केले रंग बदलणारे 2 दमदार स्मार्टफोन
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आपली Vivo V27 सीरीज भारतात लॉन्च केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने 2 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ज्यात Vivo V27 आणि Vivo V27 Pro चा समावेश आहेत. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 66 वॉट फास्ट चार्जिंगसह 4600 mAh बॅटरी मिळेल. MediaTek Dimensity 7200 आणि 8200 प्रोसेसर असलेले मोबाईल फोन लॉन्च करण्यात आले आहेत. Vivo V27 कंपनीने दोन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर केला आहे. याच्या 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 32,999 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये आहे. Vivo V27 Pro ला 6.7-इंचाचा हाय रिझोल्यूशन डिस्प्ले मिळेल. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा मोबाईल फोन MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरवर काम करेल.