How to Apply Passport process : आपण दुसऱ्या देशात प्रवास (Passport) करण्याचा विचार करीत आहात का? किंवा जर तुम्ही काही कामानिमित्त किंवा अभ्यासासाठी परदेशात जात असाल तर त्यासाठी पासपोर्ट किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहित असायला हवं. तुमच्याकडे अजूनही पासपोर्ट नसेल तर काळजी करू नका कारण तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता.


हे काम करण्यासाठी एजंट 4 ते 5 हजार रुपये आकारत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तर पासपोर्ट अर्ज करण्याचे शुल्क केवळ 1500 रुपये आहे. त्यामुळे काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेले पैसे वाचवू शकता. पासपोर्टसाठी अर्ज करण्याचा सोपा मार्ग आम्ही तुम्हाला सांगतो.


घरबसल्या Passport कसा काढाल?



-यासाठी सर्वप्रथम आपल्या डिव्हाइसवर पासपोर्ट सेवा केंद्र पोर्टल उघडा.
-येथे तुम्हाला 'न्यू युजर रजिस्ट्रेशन'वर क्लिक करावे लागेल आणि डिटेल्स भरल्यानंतर रजिस्टरवर टॅप करा.
-त्यानंतर आपल्या लॉगिन क्रेडेन्शियल्ससह पुन्हा लॉगिन करा.
-येथे तुम्हाला फ्रेश पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी/ पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी एक लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
-फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील भरा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा.
-त्यानंतर, भेटीचे वेळापत्रक ठरवण्यासाठी सेव्ह / सबमिट केलेले स्क्रीनवर पेमेंट करा.
-त्यानंतर अपॉइंटमेंट शेड्यूल करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
-येथून प्रिंट अर्ज पावतीवर क्लिक करा आणि आपल्या अर्ज केलेल्या पावतीची प्रिंट घ्या.
-एक अप्लाइड रेफरन्स नंबर (ARN) आणि अपॉइंटमेंट नंबर असेल.
-असे केल्याने तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून अपॉइंटमेंट मिळेल
-त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल जिथे तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाईल.
-तुमची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत घेऊन जा.


पेमेट कसं कराल?


सर्व PSK/POPSK/PO अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट पद्धत बंधनकारक करण्यात आली आहे. ऑनलाईन पेमेंटसाठी तुम्ही क्रेडिट/डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि एसबीआय बँकेच्या चालानद्वारे पेमेंट करू शकता.


ही कागदपत्रे आवश्यक आहेत


त्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्म दाखला, जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र ओळखपत्र, बँक पासबुकचा फोटो, दहावीची गुणपत्रिका ही आवश्यक कागदपत्रे आहेत. 


नोकरीसाठीदेखील पासपोर्ट आवश्यक


सध्यया अनेक आयटी क्षेत्रातल्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. या नोकरीच्या प्रोसेसमध्येदेखील पासपोर्टची विचारणा केली जाते. त्यामुळे अनेक कंपनीचे इंटरव्हू देताना पासपोर्ट सोबत असणं किंवा काढून ठेवणं गरजेचं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Realme Note Series : Realme ने लाँच केला Note Seriesचा पहिला स्मार्टफोन; शाओमी आणि इन्फिनिक्सला टक्कर देणार?