OnePlus 12 vs OnePlus 11 : चीनची मोबाईल निर्माता कंपनी वनप्लसने (OnePlus ) काल भारतात Oneplus 12 सीरिज लाँच केली आहे. या सीरिजअंतर्गत Oneplus 12 आणि Oneplus 12 R असे 2 स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. भारतात या सीरिजची किंमत 64,999 रुपये रुपयांपासून सुरू होते. यात आपण वनप्लस 12 आणि जुन्या मॉडेल्सचे फिचर्स पाहणार आहोत. ज्यांना आपला फोन बदलायचा असेल त्यांच्यासाठी हा फोन बेस्ट ऑप्शन आहे का? हे देखील पाहणार आहोत.
डिस्प्ले आणि प्रोसेसर कसा आहे?
वनप्लस 12 मध्ये 6.82 इंचाचा एमोलेड एलटीपीओ डिस्प्ले असून 3,168 x 1,440 रिझोल्यूशन आणि 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट आहे. या फोनचे पिक्सल रिझोल्यूशन 402आहे. दुसरीकडे जुन्या मॉडेलमध्ये 3,216 x 1,440 रिझोल्यूशन सह 6.7 इंचाचा LTPO AMOLED आणि 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. याचा PPI 525 आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर नवीन फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिप आहे, जी पूर्वीपेक्षा फास्ट आणि अधिक पॉवरची आहे. जुन्या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिप आहे. यात उत्तम परफॉर्मन्सही मिळतो.
बॅटरी आणि कॅमेरा
बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर जुन्या फोनमध्ये 5000 एमएएच ची बॅटरी मिळते तर नवीन फोनमध्ये 54000 एमएएचची बॅटरी आहे. कंपनीने चार्जरमध्येही बदल केले आहेत. जुन्या फोनमध्ये 80वॅटचा चार्जर आहे तर नव्या फोनमध्ये 100वॅटचा वायर्ड चार्जर आणि 50 वॅटचा वायरलेस चार्जिंग आहे. तसेच वनप्लस 12 मध्ये 10 वॅट रिव्हर्स चार्जिंगदेखील देण्यात आली आहे.
फोटोग्राफीच्या बाबतीत जुन्या फोनमध्ये 50+48+32MP चे तीन कॅमेरे मिळत होते, तर नव्या फोनमध्ये कंपनीने 50+48+64MP चे तीन कॅमेरे दिले आहेत. टेलिफोटो लेन्समध्ये मोठे अपग्रेड देण्यात आले आहे. तसेच 16 ते 32 मेगापिक्सेलपर्यंतच्या नव्या मॉडेलमध्ये फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. जुन्या फोनमध्ये पुढील आणि मागील बाजूस गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्ट देण्यात आला आहे, तर नवीन फोनमध्ये फ्रंटमध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 आणि मागील बाजूस ग्लास पॅनेल देण्यात आले आहे. वनप्लस 12 ला अॅल्युमिनियम फ्रेम आणि आयपी 65 रेटिंग
वनप्लस 12 मध्ये अॅल्युमिनियम फ्रेम
ड्यूरेबिलिटीच्या बाबतीत जुन्या फोनमध्ये पुढील आणि मागील बाजूस गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्ट देण्यात आला आहे, तर नवीन फोनमध्ये फ्रंटमध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 आणि मागील बाजूस ग्लास पॅनेल देण्यात आले आहे. वनप्लस 12 मध्ये अॅल्युमिनियम फ्रेम आणि आयपी 65 रेटिंग आहे. वनप्लस 11 ला तुम्ही 8/128 जीबी आणि 16/256 जीबी मध्ये खरेदी करू शकता, तर नवीन मॉडेल ला 256 जीबी / 512 जीबी आणि 1 टीबीमध्ये 12,16,24 जीबी रॅम पर्यायांसह ऑर्डर करू शकता.
कोणता फोन बेस्ट असेल?
एकंदरीत कंपनीने जुन्या फोनच्या तुलनेत नव्या फोनमध्ये बरेच अपग्रेड केले आहे. मात्र याची किंमत वनप्लस 11 पेक्षा 8,000 रुपये जास्त आहे. आपण आपल्या बजेटनुसार फोन निवडू शकता. वनप्लसचे जुने मॉडेल आता तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइटवरून स्वस्तात खरेदी करू शकता कारण ते एक वर्ष जुने झाले आहे. विजय सेलमध्ये वनप्लस 11 हा फोन 52,999 रुपयांना विकला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या