Google Maps Street View : नेव्हिगेशन अॅप Google Mapsनं आपल्या युजर्सच्या सोयीसाठी अॅपमध्ये नवनवीन फिचर्स लॉन्च करत असतं. आता Google मॅप्सचं स्ट्रीट व्यू फीचर (Street View) संपूर्ण भारतात लॉन्त करण्यात आलं आहे. गुगलनं गेल्या वर्षी भारतात स्ट्रीट व्यू फिचर लॉन्त करणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, सुरुवातीला हे फिचर प्रायोगिक तत्त्वावर बंगळुरूमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. आता लहान गावं, शहरांसह अनेक लहान मोठी ठिकाणं वर्च्युअली पाहणं शक्य होणार आहे. 


गुगलनं यापूर्वी हे फिचर लॉन्च केलं होतं, मात्र त्यानंतर काही कारणास्तव गुगलनं ही सेवा बंद केली होती. आता पुन्हा गुगलनं ही सेवा नव्यानं लॉन्च केली आहे. दरम्यान, गुगल मॅप्सचं स्ट्रीट व्यू फिचर खरंच खूप फायदेशीर आहे. कोणत्याही ठिकाणी हे फिचर तुम्हाला व्हर्च्युअली घेऊन जातं आणि असं वाटतं की, तुम्ही त्या ठिकाणीच उभे आहात. 


प्रत्येक शहर आणि गावं वर्च्युअली 360 डिग्रीमध्ये पाहणं शक्य 


गुगल मॅप्सच्या स्ट्रीट व्यू फीचर (Street View) या फिचरचा वापर करुन तुम्ही कोणतंही शहर, ठिकाण, लँडमार्क, बिल्डिंग इत्यादी 360 डिग्रीमध्ये तुम्ही पाहू शकता. तसेच, तुम्ही कुठूनही अॅपच्या मार्फत डेक्सटॉप किंवा मोबाईलवर हे फिचर पाहू शकता. 


कसं वापराल गुगल मॅप्सचं स्ट्रीट व्यू फीचर (Street View)? 


सर्वात आधी गुगल मॅपमध्ये जा आणि जे लोकेशन तुम्ही सर्च करणार आहात? ते सर्च करा. 
त्यानंतर बॉटम राइटमध्ये जाऊन लेयर ऑप्शनवर क्लिक करुन स्ट्रीट व्यू या पर्यायावर क्लिक करा 
क्लिक केल्यानंतर मॅम निळ्या रंगाच दिसू लागेल, जर तुम्ही वेबवर पाहत असाल, तर तुम्ही एक्स्प्लोर फिचरच्या मदतीनं प्रत्येक जागेचा  360 डिग्री व्यू पाहु शकता. मोबाईलवर निळ्या रंगाच्या लाइन्स दिसतील आणि लोकेशनबाबत सांगतील. 


Street View On Google Map 2016 मध्ये भारतात बॅन केलं गेलं होतं. त्यावेळी या फिचरमार्फत लोकेशनची माहीती इतर लोकांपर्यंत पोहोचतेय, असा आरोप केला जात होता. त्या कारणानं या अॅपवर 2018 मध्ये सरकारनं बंदी घातली होती. अशातच सर्व त्रुटी दूर करुन गुगलनं हे फिचर पुन्हा एकदा लॉन्च केलं आहे. 


गेल्या वर्षी Google नं सांगितलं की, Genesys International आणि Tech Mahindra यांच्या सहयोगानं हे फिचर पुन्हा लॉन्च करण्यात आलं आहे. तसेच, यामुळे कोणत्याही युजरच्या वैयक्तिक आणि गोपनिय माहितीचा दुरुपयोग होणार नाही, असंही गुगलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Daam Malware: सावध राहा! Android फोनमधून डेटा चोरणारा मालवेअर आलाय; CERT-IN नं दिलाय इशारा