Govt Warning For Social Media : सध्या सोशल मीडियावर डिपफेक आणि पॉर्नोग्राफीचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. त्यावरुन आता सरकारने कडक धोरणं आखले आहेत. फेसबुक आणि युट्युबवर अश्लीलता आणि चुकीची माहिती पसरू नये यासाठी सरकार कडक झाले आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, सरकारने फेसबुक आणि यूट्यूबसह इतर सोशल मीडिया वापरणाऱ्यांना एक इशारा दिला आहे. ज्यात सरकारने डिपफेक आणि अश्लीलता किंवा चुकीची माहिती पसरवणाऱ्या पोस्टवर पूर्णपणे बंदी घातली आहे.


रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी हा इशारा दिला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, लहान मुलांसाठी हानिकारक आणि अश्लील किंवा एखाद्या व्यक्तीचे डीपफेक व्हिडिओ आणि फोटो पूर्णपणे बॅन आहेत. तरीही जर एखाद्या युजरने ते सोशल मीडियावर पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.


दिशाभूल करणारी माहिती असलेला मजकूर पोस्ट करू नये..




चंद्रशेखर म्हणाले की, फेसबुक आणि यूट्यूबने प्रत्येक वेळी लॉग इन करताना सर्व वापरकर्त्यांना आठवण करून दिली पाहिजे की त्यांनी हिंसा, अश्लीलता आणि दिशाभूल करणारी माहिती असलेला मजकूर पोस्ट करू नये. चंद्रशेखर म्हणाले की, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे. 


विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार सरकार


ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील बनावट समस्येवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नागरिकांना ऑनलाइन बनावट मजकूर दिसल्यास एफआयआर नोंदविण्यास मदत करण्यासाठी सरकार एक विशेष अधिकारी नियुक्त करेल. सरकार एक प्लॅटफार्म तयार करेल जेथे नागरिक प्लॅटफॉर्मद्वारे कायद्याच्या उल्लंघनाच्या नोटिसा, आरोप किंवा अहवाल सरकारच्या निदर्शनास आणू शकतील. अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दीपफेकचा मुद्दा उपस्थित केला होता. गेल्या आठवड्यात G-20 देशांच्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत मोदींनी डीपफेकचे धोके अधोरेखित केले आणि एआय नियमांवर जागतिक सहकार्याचे आवाहन केले.


डीप फेक म्हणजे काय? 


डीपफेक टेक्नॉलॉजी एखाद्या व्यक्तीचा खोटा व्हिडिओ तयार करू शकते. 'Deep Learning' आणि 'Fake' अशा दोन शब्दांपासून DeepFake हा शब्द तयार झाला आहे. ही टेक्नॉलॉजी खोटे व्हिडिओ तयार करण्यासाठी Generative Adversarial Networks (GANs) याचा वापर करते. यामध्ये केवळ या व्यक्तीचा चेहराच नाही, तर त्याचा आवाज, हावभाव, डोळ्यांच्या पापण्या,  बोलताना होणारी ओठांची हालचाल, डोळ्यांचे भाव आणि अशा कित्येक गोष्टी कॉपी करता येऊ शकतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीचा काहीही बोलतानाचा व्हिडिओ तयार करता येऊ शकतो.


इतर महत्वाची बातमी-


Huawei MatePad Pro 11-inch  : सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी असलेला पहिला Huawei MatePad Pro 11-इंच 2024 टॅब, नेटवर्क नसलेल्या भागात येणार उपयोगी!