Life On Moon: सध्याचं युग हे विज्ञान-तंत्रज्ञानाचं युग आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक देशांनी विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. सध्या तर तंत्रज्ञानाच्या बदलांचा वेगही प्रचंड आहे. याच तंत्रज्ञानाच्या जोरावर काही देश पृथ्वीवरच नव्हे तर चंद्रावरही घरे बांधण्याचा विचार करत आहेत. या दिशने चीन वेगाने काम करायला सुरूवात केली आहे. यासाठी चीनकडून अनेक मोहिमांवर काम केलं जाणार आहे. चीन 2030 पर्यंत चंद्रावर माणसं पाठवण्याचा विचार करत आहे. या मोहिमेवर अमेरिका आधीपासूनच काम करत आहे. आता रांगेत चीनचा समावेश झाला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून चीन चंद्रावर घरे बांधणार (Lunar Habitation) असून त्यासाठी 3D प्रिटींग तंत्रज्ञानाची  (Moon 3D Printing Technology) मदत घेणार आहे. 


चीनच्या चंद्रमोहिमेचा मुख्य उद्देश


सध्या चीन चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी करत आहे. यासाठी चीनने मोहिमेचे काही टप्पे निश्चित केली आहेत. चीनमधील चायना डेलीच्या एका बातमीनुसार, चीन चंद्रावर घरे बांधण्यासाठी सुरूवात करणार आहे. यासाठी सुरूवातीला 3D प्रिटींगच्या तंत्रज्ञानाची मदत  घेणार आहे. यासाठी 'रोबोटिक मेसन'च्या माध्यमातून मातीच्या विटा बनवण्याच्या योजनेवर चीन काम करत आहे. सध्या चीनने  2030 पर्यंत चंद्रावर प्रवासी माणसं पाठवण्याच्या विचार करत आहे. यासाठी चंद्रावरील उपलब्ध संसाधनाचा जास्तीत जास्त वापरण्यावर चीन भर देणार असल्याचं समजतं. हा चीनचा मुख्य उद्देश्य आहे.  


अशी असेल चीनची चंद्रमोहिम 


चीनने चंद्रावर प्रवासी माणसं पाठवण्याचा विचार करताना चंद्रमोहिम अनेक टप्प्यातून जाणार आहे. यासाठी चीनने चांग ई- 6 (Chang'e-6),चीनने चांग ई- 7 (Chang'e-7),आणि चांग ई- 8  (Chang'e-8),मोहिमेचे टप्पे निश्चित करण्यात आले. ही मोहिम 2030 पर्यंत राबवण्यात येणार आहे. चायना डेलीच्या एका बातमीनुसार, चांग ई-  (Chang'e-8) ही मोहिम चीनची विशेष मोहिम असणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर जाऊन माणसं राहू शकतील का? माणसासाठी अनुकूल वातावरण आहे का? आणि तेथील जमिनीखाली खनिजे आहेत का? याची माहिती गोळा केली जाणार आहे. तसेच, चंद्रावर दीर्घकाळ राहण्यासाठी चंद्रावर काही स्पेस स्टेशन बनवण्याचा विचार चीन करत आहे. त्यासाठी तेथील वातावरणाचा विचार करून हे स्पेस स्टेशन बनवले जाणार असल्याचं समजतं. यावरून चीन चंद्रावरील संसाधनाचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, हे स्पष्ट दिसून येतं. 2030 पर्यंत चीन चंद्रावर 3D प्रिटींगच्या मदतीने घरे बांधायला सुरूवात करण्याची शक्यता आहे. 


चंद्रावर किती आहे तापमान?


DW या डिजिटल पोर्टलच्या रिपोर्टनुसार, चंद्रावर काही काही ठिकाणी असे खड्डे आहेत जिथे पृथ्वीसारखं वातावरण असून तिथं माणूस राहू शकतो. चंद्रावर दिवसा तापमान 280 डिग्री असतं तर रात्री मायनस 250 डिग्री पर्यंत असतं. यापूर्वीही अनेकदा चंद्रावर माणूस राहू शकतो, अशा प्रकारच्या बातम्या आल्या आहेत. या दिशेने अजून संशोधक अभ्यास करत आहेत. त्यामुळे भविष्यात चंद्रावर माणूस राहू शकेल, अशी शक्यता निर्माण होईल.


दरम्यान चीनने 2020 मध्ये एक चंद्रयान मोहिम राबवली होती. चांग ई- 5  या मोहिमेच्या माध्यातून सर्वप्रथम चंद्रावरून परीक्षणासाठी माती आणली होती. यापूर्वी चीनने 2013 मध्ये चंद्रावर यान लॅंड केलं होतं. हे सर्व यान मानवविरहित यान होते. आता चीन 2030 पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याचा उद्देश निश्चित केला आहे.