नवी दिल्ली :  जगभरात मृत्यूतांडवासाठी कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरसनं आता अर्थव्यवस्था पोखरायला सुरुवात केली आहे. जगभरातल्या शेअर बाजाराप्रमाणे शेअर बाजार गेले काही दिवस कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.  देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक बाजारपेठेतील संकेत फारसे चांगली दिसत नाही आणि त्याचाच परिणाम आज शेअर बाजारावर दिसून येत आहे. आज दिवसाची सुरुवात स्टॉक मार्केटमधील घसरणीने झाली. प्री-ओपन ट्रेडमध्ये मार्केटमध्ये एक मोठी कमकुवतपणा दिसून आला, ज्यामुळे आज शेअर बाजारात सुरूवातीच्या काळात घसरण होणार हे स्पष्ट झालं होतं. आज दिवसाच्या सुरुवातील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बाजाराच्या सुरुवातीच्या 5 मिनिटांतच सेन्सेक्स 915 अंकानी म्हणजे 2.89 टक्क्यांनी घसरण झाली. या घसरणीसह सेन्सेक्स 30732 वर व्यापाराला सुरुवात झाली. NSE चा निर्देशांक निफ्टीची सुरुवात 9014 अंकानी झाली. सुरुवातीच्या 5 मिनिटांत 256.40 अंकांनी म्हणजे 2.77 टक्क्यांनी घरसण पाहायला मिळाली. या घसरणीसह निफ्टी 9005वर बाजाराला सुरुवात झाली. प्री-ओपन ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 800 अंकानी घरसण पाहायला मिळाली. सुरुवातील सेन्सेक्स 30,836 अकांवर बाजाराला सुरुवात झाली. तर निफ्टीत 231 अंकानी घसरण होत 9030 अंकानी बाजाराला सुरुवाती झाली. निफ्टी 50च्या शेअर्सची स्थिती बाजाराच्या सुरुवातील निफ्टी 50 मधील फक्त दोन शेअर वधारलेले पाहायला मिळाले. तर बाकीचे 48 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. वधारलेल्या दोन शेअर मध्ये आईटीसी 1 टक्का तर डॉ. रेडीज लॅब्स 0.63 टक्क्यांनी वाढत व्यापार करताना दिसून आले. आशियाई बाजारातील स्थिती भारतीय बाजाराप्रमाणे आशियाई बाजारातही घसरण पाहायला मिळाली आहे. जपानचं निक्केईत 1.5 टक्क्यांची घरसण तर हाँगकाँगच्या हँगसेंगमध्ये 2 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. कोस्पीही 2 टक्क्यांनी घसरला आहे आणि सिंगापूरच्या स्ट्रीट टाईम्समध्ये 0.70 टक्क्यांच्या घसरणीसह व्यापार होताना दिसत आहे. दरम्यान कोरोनानंतर संपूर्ण जगावर मंदीच सावट येणार असल्याचा अंदाज अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्येच कच्च्या तेलाच्या किमतीत इतिहासातील सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाची किंमत बाटलीबंद पाण्यापेक्षाही कमी झाली आहे. कच्च्या तेलाची किंमत शून्य डॉलरपेक्षा कमी झाली आहे. वायदा बाजारात कच्च्या तेलाची किंमत -37.56 डॉलर प्रति बॅरल नोंदवण्यात आली आहे. फक्त तीन महिन्यांमध्ये कच्च्या तेलांच्या किमतीमध्ये मोठ्याप्रमाणावर घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.