Pinkathon 2025–26 season : मुंबई पिंकाथॉनच्या 10व्या पर्वासाठी सज्ज; ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीसाठी मोठी मोहीम
भारतातील सर्वात मोठी महिलांची पिंकाथॉन या वर्षी आपल्या ऐतिहासिक 10व्या पर्वासह पुन्हा त्या मुंबईत परत येत आहे.

Pinkathon 2025–26 season Zydus title partner : भारतातील सर्वात मोठी महिलांची पिंकाथॉन या वर्षी आपल्या ऐतिहासिक 10व्या पर्वासह पुन्हा मुंबईत परत येत आहे. हजारो महिलांना फिटनेस, समुदायभावना आणि स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक करणारी ही मोहीम यंदा झायडस लाइफसाइन्सेस लिमिटेड या टायटल स्पॉन्सरसोबत एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. या मोहीमचा हेतू स्तन कर्करोगाविषयी जागरूकता वाढवणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे हा आहे.
21 डिसेंबर रोजी बीकेसीतील एमएमआरडीए ग्राउंड येथे होणाऱ्या उद्घाटन धावेत 3 किमी, लाइफलॉन्ग 5 किमी व 10 किमी अशा समुदाय धावा, तर 50, 75, 100 किमी व 100 किमी रिले अशा अल्ट्रा डिस्टन्स शर्यतींचा समावेश असेल. त्यामुळे कधी न धावणाऱ्या महिलांपासून ते अनुभवी धावपटूंपर्यंत प्रत्येकासाठी काही ना काही आकर्षण असेल. मुंबईतून निघालेली ही मोहीम पुढील नऊ महिन्यांत बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्लीसह सहा शहरांत पोहोचेल.
2012 मध्ये अभिनेता व फिटनेस दूत मिलिंद सोमन यांच्या संकल्पनेतून ही मोहीमने आजवर पाच लाखांहून अधिक महिलांना धावण्याच्या माध्यमातून प्रेरित केले आहे. हजारो महिलांची मोफत स्तन तपासणी केली आहे, वंचित रुग्णांसाठी कोट्यवधींची मदत उभी केली आहे आणि 300 पेक्षा अधिक ठिकाणी एम्बेसॅडर नेटवर्क उभारले आहे.
मुंबई पिंकाथॉन 2025–26 च्या अनावरणप्रसंगी बोलताना मिलिंद सोमन म्हणाले, “महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे, हीच आमची ध्येयवाणी आहे. झायडसच्या सहकार्याने ही मोहीम अधिक बळकट होत आहे. स्तन कर्करोगाविषयी जागरूकता तर पसरवायचीच आहे पण प्रतिबंध व लवकर निदान हेही तितकेच महत्त्वाचे आहे.”






















