Yuvraj Singh ,Hazel Keech : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि त्याची पत्नी  हेजल कीच (Hazel Keech) यांना  25 जानेवारी रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. युवराज सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना ही  गोड बातमी दिली होती. आता नुकताच एक खास व्हिडीओ युवराजनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये युवराजच्या मुलाची झलक दिसत आहे. 


युवरानं  शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये युवराजच्या मुलाचे आणि हेजलचे काही फोटो दिसत आहे. या व्हिडीओला युवराजनं कॅप्शन दिलं, 'या मदर्स-डेला एक वडील म्हणून माझा प्रवास सांगताना मी भारावलो आहे. मला वाटतं की आई वडील झाल्यानंतर मुलाचे पालन-पोषण करताना आपण एकमेकांचे पार्टनर झाले पाहिजे.  डायपरिंग असो वा फीडिंग मी प्रत्येक गोष्ट शिकत होतो. आपल्या पार्टनरला आज प्रोमिस करुयात की, पॅरेंटिंगमध्ये पार्टनरशिप ही केवळ मदर्स-डेला नाही दररोज करुयात.'






12 नोव्हेंबर 2015 मध्ये हेजल आणि युवराजचा साखरपुडा झाला. 30 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांचा विवाह सोहळा पार पडला. युवराजची पत्नी हेजल ही अभिनेत्री आहे. तिने जाहिरातींमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सलमान खानच्या 'बॉडीगार्ड' या चित्रपटामध्ये हेजलनं प्रमुख भूमिका साकारली आहे. 


हेही वाचा :