एक्स्प्लोर

SL vs ZIM : झिम्बाब्वेनं श्रीलंकेला घरात घुसून हरवलं, 6 विकेटनं दणदणीत विजय, टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजयाची हॅटट्रिक

SL vs ZIM Highlights: टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये झिम्बाब्वेच्या संघानं विजयाचा धडाका सुरु ठेवला आहे. ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेला त्यांनी पराभूत केलंय. 

Sri Lanka vs Zimbabwe Highlights कोलंबो : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेनं त्यांच्या कामगिरीनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता श्रीलंकेला देखील पराभवाचा धक्का दिला आहे. झिम्बाब्वेनं श्रीलंकेवर 6 विकेटनं विजय मिळवला आहे. श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 178 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेनं 19 व्या ओव्हरमध्ये 182 धावा करत 6 विकेटनं विजय मिळवला. या विजयासह झिम्बाब्वेनं ब गटात पहिलं स्थान पटकावलं आहे. 

ZIM vs SL :  झिम्बाब्वेचा श्रीलंकेला दणका

झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेट्ट यानं नाबाद 63 धावांची खेळी केली. त्याला सिकंदर रझानं  45 धावा आणि तदिन्वाशे मरुमनी यानं 34 धावा करत साथ दिली. या विजयानं झिम्बाब्वेचा आत्मविश्वास वाढला आहे. झिम्बाब्वेनं या वर्ल्ड कपमध्ये यापूर्वी ऑस्ट्रेलियाला पराभवाचू धूळ चारली होती.  

श्रीलंकेनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणाऱ्या पाथुम निसांका यानं आजच्या मॅचमध्ये  62 धावा केल्या. तर, पवन रत्ननायके यानं 44 धावांची खेळी केली. कुशल परेरानं 22 धावा केल्या या जोरावर श्रीलंकेनं  7 बाद 178 धावा केल्या.  

श्रीलंकेनं विजयासाठी झिम्बाब्वेसमोर 179 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान त्यांनी  19.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. आच्या मॅचमधील दमदार कामगिरीसाठी झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझा याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला आहे. 

झिम्बाब्वेची दमदार कामगिरी 

झिम्बाब्वेच्या संघानं सिकंदर रझाच्या नेतृत्त्वात दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. झिम्बाब्वेला यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या कामगिरीच्या जोरावर पुढील टी 20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळालं आहे. झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलिया, ओमान आणि श्रीलंकेला पराभूत केलं. तर, साखळी फेरीतील झिम्बाब्वे विरुद्ध आयरलँड यांच्यातील सामना पावसामुळं होऊ शकला नाही. यामुळं झिम्बाब्वेकडे 7 गुण झाले आहेत. ब गटात झिम्बाब्वे पहिल्या स्थानावर आहे. तर, श्रीलंका 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

सुपर 8 मध्ये झिम्बाब्वे समोर तगडं आव्हान 

साखळी फेरीत झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं आहे. आता सुपर 8 मधून पुढं जायचं असल्यास झिम्बाब्वेला दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, भारत यांचा सामना करावा लागेल. भारत आणि झिम्बाब्वे यांचा सामना  26 फेब्रुवारीला होणार आहे.  झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढत 1 मार्चला होणार आहे. सुपर 8 मधून उपांत्य फेरी गाठायची असल्यास झिम्बाब्वेला दमदार कामगिरी करावी लागेल.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda On Indusrty: 'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
Mira Bhayandar News :आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Embed widget