T20 World Cup Teams : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरू होत आहे. उद्यापासून पात्रता सामने सुरू होणार असून आता सहभागी सर्वच 16 संघानी आपले अंतिम 15 खेळाडू जाहीर केले आहेत. विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वीच भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशने आपआपल्या संघात मोठे बदल केले आहेत. भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या संघात केलेले बदल आणि तिन्ही संघांच्या अंतिम 15 खेळाडूंची संपूर्ण यादी पाहूया...


बुमराहच्या जागी शमीची एन्ट्री


भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्वचषक अगदी तोंडावर असताना दुखापत झाली. त्यामुळे भारतात बुमराहच्या जागी कोण खेळणार? हा प्रश्न सर्वांसमोर होता. ज्यानंतर नुकतीच टीम इंडियाने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची बुमराहच्या जागी संघात एन्ट्री केली आहे. त्यामुळे आता बुमराहच्या जागी शमी आल्यानंतर T20 विश्वचषकासाठी भारताचे अंतिम 15 खेळाडूंची यादी समोर आली आहे.


बांग्लादेशच्या संघात दोन बदल


बांग्लादेशने संघ बदलण्याची अंतिम मुदत म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत असताना आपल्या संघात बदल केला आहे. T20 विश्वचषक संघातील बदलांबद्दल माहिती देताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सौम्या सरकार आणि शोलीफुलचा बांग्लादेशच्या विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे. तो सब्बीर रहमान आणि सैफुद्दीनची जागा घेणार आहे.  


पाकिस्तान संघानेही केले बदल


भारत, बांग्लादेशसह पाकिस्तानचे देखील आपल्या संघात बदल केला आहे. 23 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. त्यापूर्वी पाकिस्तानने 15 सदस्यीय संघात फखर जमानचा समावेश केला आहे. तर उस्मान कादिरला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.


असे आहेत तिन्ही संघ-


भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह


राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर 


पाकिस्तानचा संघ


बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद


राखीव खेळाडू : उस्मान कादिर, मोहम्मद हॅरीस, शाहनवाज दहानी.


बांग्लादेशचा संघ 


शाकिब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन, अफिफ हुसैन, इबादोत हुसेन, हसन महमूद, लिटन दास, मेहिदी हसन मिराझ, मुस्तफिजुर रहमान, नजमुल हुसेन शांतो, शॉरीफुल इस्लाम, सौम्या सरकार, मुसद्देक हुसेन, नसुम अहमद, तस्किन अली अहमद, यासी. चौधरी


राखीव खेळाडू : महेदी हसन, रिशाद हुसैन, सब्बीर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन


हे देखील वाचा -