T20 World Cup Semi Final Rain Rules नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि भारत हे चार संघ पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 फेब्रुवारीला कोलकाता येथे उपांत्य फेरीची लढत होणार आहे. तर, 5 मार्चला भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने पावसामुळं रद्द झाल्यास उपांत्य फेरीत कोणते संघ पोहोचणार? आयसीसीचा या संदर्भातील नियम काय हे जाणून घेणार आहोत.
उपांत्य फेरीचा सामना रद्द झाल्यास काय?
उपांत्य फेरीच्या लढतीत पाऊस झाल्यास किंवा इतर कारणामुळं सामना रद्द झाल्यास फायनलमध्ये कोणता संघ पोहोचेल. आयसीसीचे पावसासंदर्भातील नियम काय आहेत हे जाणून घेऊयात. 5 मार्चला भारत आणि इंग्लंड सामना पावसामुळं होऊ शकला नाही तर राखीव दिवसाचा नियम लागू होईल. उपांत्य फेरीसाठी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच 5 मार्चला भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन होऊ न शकल्यास 6 मार्चला होईल.
राखीव दिवशी देखील सामना पावसामुळं रद्द करावा लागल्यास अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार याबाबत आयसीसीचा नियम निश्चित आहे. उपांत्य फेरीचा सामना दोन्ही दिवशी होऊ न शकल्यास सुपर 8 मध्ये दोन्ही ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर असलेले संघ अंतिम फेरीत पोहोचतील. म्हणजेच दोन्ही उपांत्य फेरीचे सामने होऊ शकले नाहीत तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना होईल.
उपांत्य फेरीचं वेळापत्रक
2026 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना 5 मार्चला होणार आहे.ही मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये वर होणार आहे.
4 मार्चला दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना होणार आहे. ही मॅच कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये होणार आहे.
भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad T20 WC)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग
