T20 World Cup 2026 : वेस्ट इंडिजनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 10 वर्षानंतर इंग्लंडचा केला पराभव, रोमांचक लढतीत 30 धावांनी विजय
WI vs ENG Highlights: वेस्ट इंडिजनं इंग्लंडला 30 धावांनी पराभूत केलं आहे. टी 20 वर्ल्ड कपमधील वेस्ट इंडिजचा हा दुसरा विजय आहे.

West Indies vs England Highlights मुंबई : वेस्ट इंडिजनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला 30 धावांनी पराभूत केलं आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजनं इंग्लंडला 10 वर्षानंतर पराभूत केलं आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ 166 धावा करु शकला. रुदरफोर्डनं 76 धावा केल्यानं वेस्ट इंडिजचा संघ 196 धावा करु शकला.
इंग्लंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. वेस्ट इंडिजनं पहिल्या दोन ओव्हरमध्ये 2 विकेट गमावल्या होत्या. मात्र, रुदरफोर्डनं 76 धावांची नाबाद खेळी केली. जेसन होल्डरच्या 33 धावा तर रॉस्टन चेज 34 धावांमुळं वेस्ट इंडिजनं 196 धावा केल्या. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजनं 66 धावा केल्या.
10 वर्षानंतर वेस्ट इंडिजचा विजय
वेस्ट इंडिजनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला 2016 मध्ये पराभूत केलं होतं. 2016 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं इंग्लंडचा 4 विकेटनं पराभव केला होता. त्यानंतर 10 वर्षांमध्ये वेस्ट इंडिजला इंग्लंडवर विजय मिळवता आला नव्हता. मात्र, 10 वर्षांचा दुष्काळ वेस्ट इंडिजनं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संपवला आहे. इंग्लंडचा टी 20 वर्ल्ड कपमध्ये 30 धावांनी पराभव झाला. तर, वेस्ट इंडिजचा हा सलग दुसरा विजय ठरला.
197 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या एकाही फंलदाजाला मोठी खेळी करता आली नाही. जेकब बैथेलनं 33 धावा केल्या. सॅम करन 43 धावा करु शकला. जोस बटलरनं 21 धावा केला. मात्र, इंग्लंडला विजय मिळवता आला नाही.
यंदाचा टी 20 वर्ल्ड कप इंग्लंडसाठी आव्हानात्मक ठरत आहे. नेपाळ विरुद्धच्या मॅचमध्ये इंग्लंडला विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. नेपाळ विरुद्ध खेळताना इंग्लंडचा संघ पराभवाच्या छायेत होता. आता दुसऱ्या मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव झाला आहे.
























