एक्स्प्लोर

T20 World Cup 2026 : टी 20 विश्वचषकातून कांगारु आऊट, ऑस्ट्रेलिया 2009 नंतर साखळी फेरीत पहिल्यांदा बाद, झिम्बॉब्वेला डबल लॉटरी

Australia : टी 20 वर्ल्ड कप 2026 मधील ऑस्ट्रेलियाचा प्रवास अखेर संपला आहे. सुपर 8 च्या शर्यतीतून ऑस्ट्रेलिया बाहेर गेलं आहे.

Zimbabwe Super 8 T20 World Cup कोलंबो : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर गेला आहे. झिम्बॉब्वे आणि आयरलँड यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाल्यानं ऑस्ट्रेलिया टी 20 विश्वचषकातून बाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलियाला टी 20 विश्वचषकातून दुसऱ्यांदा साखळी फेरीतून बाहेर जावं लागंल आहे. दुसरीकडे झिम्बॉब्वे आणि आयरलँड यांना सामना रद्द झाल्यानं प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. यामुळं झिम्बॉब्बेचे ब गटात 5 गुण झाले. ब गटातून श्रीलंका यापूर्वीच सुपर 8 मध्ये दाखल झालं आहे. यानंतर झिम्बॉब्वे देखील सुपर 8 मध्ये पोहोचलं आहे. 

Australia : ऑस्ट्रेलिया विश्वचषकातून बाहेर

ऑस्ट्रेलियानं टी 20 विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. तर, ऑस्ट्रेलियाला केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा झिम्बॉब्वेनं पराभूत केलं. यानंतर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल मॅच पार पडली. श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला 8 विकेटनं पराभूत केलं. यामुळं तीन सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 2 गुण आहेत. तर, झिम्बॉब्वेकडे आता  5 गुण आहेत. ऑस्ट्रेलियानं अखेरच्या सामन्यात ओमानवर विजय मिळवला तरी त्यांच्याकडे 4 गुण होतील. ते झिम्बॉब्वेच्या पुढं जाऊ शकत नाहीत. यामुळं ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

सुपर 8 मध्ये कोण कोण पोहोचलं?

ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ विश्वचषकातून बाहे गेला आहे. यापूर्वी 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ टी 20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत बाद झाला होता. आतापर्यंत 7 संघ टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये पोहोचले आहेत. यामध्ये ब गटातून श्रीलंका आणि झिम्बॉब्वे, क गटातून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड, ड गटातून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. अ गटातून भारत सुपर 8 मध्ये दाखल झाला आहे. अ गटातून पाकिस्तान आणि अमेरिका  याच्यांतील एक संघ सुपर 8 मध्ये पोहोचेल. 

झिम्बॉब्वेला डबल लॉटरी  

टी20 वर्ल्ड कप इतिहासात झिम्बॉब्वे पहिल्यांदा सुपर 8 मध्ये पोहोचलं आहे. 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कपच्या फॉरमॅटमध्ये बदल झाला होता. त्यानंतर झिम्बॉब्वे पहिल्यांदा ग्रुप स्टेजमधून पुढं पोहोचलं आहे. 2022 मध्ये झिबॉम्बेनं सुपर-12 मध्ये प्रवेश मिळवला होता.

दरम्यान, पुढील टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याकडून आयोजित केला जाणार आहे. यामुळे ते आपोआप पुढील टी 20 वर्ल्ड कपला पात्र ठरले आहेत. आयसीसीच्या ट्रान्स टास्मन नियमानुसार सुपर 8 मध्ये दाखल झालेले संघ पुढील टी 20 वर्ल्ड कपसाठी आपोआप पात्र ठरतात. त्यानुसार झिम्बॉब्वेला पुढील टी 20 वर्ल्ड कपसाठी पात्रता फेरी खेळावी लागणार नाही.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
Team India : टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget