T20 World Cup 2022: आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत श्रीलंकेनं आयर्लंडविरुद्ध (Sri Lanka vs Ireland) नऊ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावून आयर्लंडच्या संघाला अवघ्या 128 धावांपर्यंत मजल मारता आली. लॉर्कन टकर आणि पॉल स्टर्लिंग यांच्याशिवाय कोणत्याही आयरिश फलंदाजाला क्रिझवर जास्त काळ टिकता आलं नाही. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगा आणि महीश तिक्ष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
तिक्ष्णानं चार षटकांत फक्त 19 धावा दिल्या. तर हसरंगानं चार षटकांत 25 धावा दिल्या. या सामन्यात श्रीलंकेनं सहा गोलंदाज आजमावले. सर्वांनी चांगली गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेनं अवघ्या 15 षटकांत एक विकेट्स गमावून हा सामना जिंकला. कुशल मेंडिसनं 43 चेंडूत नाबाद 68 आणि चरित अस्लंकानं 22 चेंडूत 31 नाबाद धावा केल्या. धनंजय डी सिल्वानं 25 चेंडूत 31 धावांची खेळी केली. परंतु, गॅरेथ डेलनीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.ॉ
ट्वीट-
श्रीलंकेच्या संघाचं जोरदार कमबॅकटी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा नामिबियाकडून 55 धावांनी पराभव झाला होता. एकेकाळी हा संघ सुपर-12 मध्येही पोहोचणार नाही असं वाटत होते. पण त्यानंतर श्रीलंकेनं यूएई आणि त्यानंतर नेदरलँडचा पराभव करून सुपर -12 मध्ये स्थान मिळवलं.
संघ-
श्रीलंकेची प्लेईंग इलेव्हन:कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, अशेन बंदारा, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्ष्णा, बिनुरा फर्नांडो, लाहिरू कुमारा.
आयर्लंडची प्लेईंग इलेव्हन:पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), लॉर्कन टकर (विकेटकिपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क अडायर, सिमी सिंग, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल.
हे देखील वाचा-