Jos Buttler in T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आज ग्रुप 1 मधील न्यूझीलंड आणि इंग्लंड (NZ vs ENG) यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने तीन दमदार रेकॉर्ज स्वत:च्या नावावर केले आहेत. इंग्लंड 20 धावांनी सामना जिंकला असून 47 चेंडूत 73 धावा करणाऱ्या बटलरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. यावेळी त्याने तीन खास रेकॉर्ड नावावर केले आहेत. 


आजच्या सामन्यासह इंग्लंडसाठी सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा बटलर दुसरा खेळाडू बनला आहे. तसंच या फॉरमॅटमध्ये संघासाठी सर्वाधिक धावा करणार फलंदाज जोस बनला आहे. बटलरने आज 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने पूर्ण केले आहेत.त्याने 100 सामन्यातील 92 डावांमध्ये 2 हजार 468 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 1 शतकं आणि 18 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम टी20 आंतरराष्ट्रीय धावसंख्या नाबाद 101 आहे. या फॉरमॅटमध्ये बटलर 19 वेळा नाबाद देखील राहिला आहे. त्यामुळे बटलर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तसेच इंग्लंडसाठी सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मॉर्गन हा इंग्लंडसाठी सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा खेळाडू आहे. यानंतर तिसऱ्या रेकॉर्डचा विचार केला तर इंग्लंडकडून मोईन अलीच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकण्याचा विक्रम आहे. त्याने हा पुरस्कार 9 वेळा जिंकला आहे. तर बटलरने आजच्या सामन्यातील पकडून 8 वेळा हा पुरस्कार जिंकल्यानंतर तो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. डेव्हिड मलान आणि मॉर्गन यांनीही हा पुरस्कार 8-8 वेळा जिंकला आहे.


सामन्यात 20 धावांनी इंग्लंड विजयी


सर्वात आधी सामन्यात टॉस जिंकत इंग्लंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो निर्णय अगदी योग्य निघाला सलामीवीरांनी दमदार भागिदारी केली. कर्णधार जोस बटलरने सामन्याक 73 धावांची तुफान खेळी केली. तर हेल्सने 52 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने 20 धावांचं योगदान दिलं असून इतर फलंदाज दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. पण सलामीवीरांच्या भागिदारीच्या जोरावर इंंग्लंडने 179 धावा केल्या. ज्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पण केन विल्यमसन आणि ग्लेन फिलिप्स यांनी चांगली भागिदारी करत डाव सावरला. दोघे सामना जिंकवून देतील असे वाटत होते. पण तेव्हात केन 40 तर ग्लेन 62 धावा करुन बाद झाला आणि त्यानंतर इतर खेळाडूंना खास कामगिरी करता न आल्याने 159 धावाच न्यूझीलंड करु शकला. ज्यामुळे 20 धावांनी सामना इंग्लंडने जिंकला.   


हे देखील वाचा-