Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
Ishan Kishan Injury: टी20 वर्ल्ड कपमध्ये उद्या भारत आणि नामिबिया यांच्यात मॅच होणार आहे. या मॅचपूर्वी भारताचा फलंदाजी ईशान किशन दुखापतग्रस्त झाल्याचं पाहायला मिळालं.

Ishan Kishan Injury Update नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा आजारी असल्यानं सूर्यकुमार यादवसमोरील अडचणी वाढलेल्या असताना ईशान किशन दुखापतग्रस्त झाला आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि नामिबिया यांच्यात उद्या सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी आज टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव केला. या वेळी ईशान किशनच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे. जसप्रीत बुमराहनं टाकलेला यॉर्कर ईशान किशनच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर आदळला. ज्यामुळं ईशान किशनला सरावादरम्यान वेदना होत असल्याचं पाहायला मिळालं. यानंतर ईशान किशन फिजिओकडून उपचार घेत असल्याचं पाहायला मिळालं.
ईशान किशनला दुखापत झाली असली तरी चांगली बाब म्हणजे त्यानं पुन्हा सराव सुरु केला. मात्र, दुसऱ्यांदा सराव सुरु केल्यानंतर त्यानं पुढील 5 मिनिटांमध्ये सराव बंद केला. बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही. मात्र, मिडिया रिपोर्टनुसार ईशान किशन बरा असून घाबरण्याचं कारण नाही.
अभिषेक शर्मा आजारी
टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा आजारी आहे. या दरम्यान ईशान किशनला झालेली दुखापत टीम इंडियाचं टेन्शन वाढवण्याची शक्यता आहे. नामिबिया विरूद्धच्या मॅछपूर्वी पत्रकार परिषदेत तिक वर्मानं अभिषेक शर्माला रुग्णालयातून सोडण्यात आल्याचं सांगितलं. अभिषेक शर्मा उद्याची मॅच खेळेल की नाही हे सांगता येत नाही म्हटलं. उद्या मॅचपूर्वी अभिषेक शर्माबद्दल अंतिम निर्णय होईल, असंही तिलक वर्मा म्हणाला.
दरम्यान, भारत अ गटात दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्ताननं दोन सामन्यात विजय मिळवला असून 4 गुणांसह ते पहिल्या स्थानावर आहेत. नामिबियाला पराभूत करुन टीम इंडिया पुन्हा पहिल्या स्थानावर पोहोचू शकते.
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर.
























