(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virender Sehwag: टीम इंडियाच्या जेवणातील मेन्यू पाहून वीरेंद्र सेहवाग चांगलाच संतापला; ट्विटरवर दिली 'अशी' प्रतिक्रिया
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानल नमवून भारतीय संघानं स्पर्धेची सुरुवात गोड केली.
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानल नमवून भारतीय संघानं स्पर्धेची सुरुवात गोड केली. यानंतर या स्पर्धेतील दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळण्यासाठी भारतीय सिडनीत दाखल झाला. नेदरलँड्सविरुद्ध सामन्यापूर्वी मंगळवारी भारतीय संघाचं सराव सत्र पडले. या सरावानंतर भारतीय संघाच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये जे दिले गेले, त्यावर खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आता भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं ट्विटरच्या माध्यमातून संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.
वीरेंद्र सेहवागचं ट्वीट-
Gone are the days when one used to think that the Western countries offer so good hospitality. India are way ahead of most western countries when it comes to providing hospitality of the highest standards.
— Virender Sehwag (@virendersehwag) October 26, 2022
वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग भारतीय संघासोबतच्या अशा वागणुकीमुळं संतापला आहे. वीरेंद्र सेहवागनं ट्विट करून लिहिलंय की, "ते दिवस गेले जेव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध होत्या आणि अशा बाबतीत तो पुढे असायचा. भारत आता आदरातिथ्यामध्ये खूप पुढे आहे आणि आमच्या सुविधाही पाश्चात्य देशांपेक्षा चांगल्या आहेत."
इतर संघासाठीही सारखाच मेन्यू
टी-20 विश्वचषक आयसीसीचा इव्हेंट आहे. या स्पर्धेदरम्यानची सराव सत्रे आणि इतर गोष्टींची सोय करणं, हे आयसीसीचं काम आहे. वादाची ठिणगी पडलेल्या ब्रेकफास्टची व्यवस्था आयसीसीनंच केली असून सर्व संघांसाठी सारखाच मेनू आहे. अशा स्थितीत भारतीय संघालाही तेच मिळालं आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनाची आयसीसीकडं तक्रार
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, "दोन तासांच्या प्रशिक्षणानंतर तुम्ही फक्त थंड सँडविच, एवोकॅडो, काकडी आणि टोमॅटो खाऊ शकत नाही. एवढेच नाही तर सराव सत्रासाठी मिळालेल्या हॉटेलपासून दूर मिळालेल्या जागेमुळंही भारतीय संघ नाराज होती. त्यामुळं त्यांनी त्याच दिवशी सराव करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी टीम इंडियाच्या व्यवस्थापनानं आयसीसीकडे अधिकृत तक्रार केली आहे.
हे देखील वाचा-