T20 World Cup 2022: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघानं टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं पाकिस्तानचा (India vs Pakistan) धुव्वा उडवला. दरम्यान, 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) खेळण्यात आलेल्या पाकिस्तानविरुद्ध सामन्यात विराट विराटनं मोक्याच्या क्षणी 53 चेंडूत नाबाद 82 खेळी केली. या थरारक सामन्यादरम्यान विराट कोहलीनं (Virat Kohli) त्याची बॅट बदलली होती, ज्याचं कारण त्यानं रवी शास्त्रीशी (Ravi Shastri) बोलताना सांगितलं आहे.


मॅच विनिंग खेळीनंतर विराट कोहलीनं सामन्याबद्दल भारताची माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केली. सामन्यादरम्यान विराट कोहली आणि हार्दिक पांड्या रनरेट वाढवण्यासाठी नेमकी कोणती योजना आखली? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर विराट म्हणाला की, "आम्ही सुरुवातीला गॅपमध्ये खेळण्याची योजना आखली. ज्यामुळं विरुद्ध संघ पॅनिक होऊन खेळाडूंना आत बोलवतील. सुरुवातीला आम्ही दोन-दोन धावा घेतल्या आणि त्यानंतर खेळाडूंच्या डोक्यावरून फटके मारले. यावेळी मी माझी बॅट बदलली. मी हलक्या बॅटनं खेळलो. त्यांचे तिन्ही वेगवान गोलंदाज सुमारे 145, किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी करत होते."


ट्वीट-




 


रोमहर्षक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर चार विकेट्सनं विजय 
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या भेदक गोलंदाजी करत कर्णधाराचा निर्णय असल्याचं सिद्ध केलं. पाकिस्ताननं 20 षटकात आठ विकेट्स गमावून 159 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना चार विकेट्सनं जिंकला.


नेदरविरुद्ध विजयासाठी भारतीय संघ सज्ज
नेदरलँडचा संघानं पात्रता फेरीत यूएई आणि नामिबियाचा पराभव करून सुपर -12 मध्ये स्थान मिळवलंय. दरम्यान, नेदरलँड्सला सुपर-12 फेरीतील त्यांच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशकडून 9 धावांनी पराभव स्वीकाराला लागलाय. दुसरीकडं पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. अशा स्थितीत दुबळ्या नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून भारतीय संघ रन रेटमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल.


हे देखील वाचा-