Team India : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) सामना विश्वचषकातील दुसरा सेमीफायनलचा सामना असणार असून जिंकणारा संघ पाकिस्तानविरुद्ध फायनलचा सामना खेळणार आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला 7 विकेट्सने मात देत धडाकेबाज पद्धतीनं फायनल गाठली आहे. आता उद्या अर्थात 10 नोव्हेंबरला इंग्लंड आणि भारत यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे. दरम्यान भारत विजयी झाल्यास भारत विरुद्ध पाकिस्तान असा फायनलचा सामना रंगणार आहे.


त्यामुळे 2007 च्या विश्वचषकाप्रमाणे फायनल पुन्हा एकदा रंगू शकते, त्यात मागील काही वर्षे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कट्टर प्रतिस्पर्धीपणा पाहता हा सामना दोन्ही संघासाठी फार म्हणजे फारच महत्त्वाचा असेल आणि पराभूत होणाऱ्या संघाला देशातील चाहंत्याकडून खूप रोष सहन करावा लागू शकतो. त्यामुळेच आता सेमीफायनलच्या सामन्यापूर्वीत बरेच मीम्मस व्हायरल होत असून एक मीम मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय चाहते 'पराभूत व्हायचंय तर इंग्लंडविरुद्ध व्हा,पाकिस्तानकडून पराभव सहन होणार नाही,' असा संदेश टीम इंडियाला देत आहेत. तर असेच काही हटके मीम्स पाहूया...



















कधी, कुठे पाहाल भारत विरुद्ध इंग्लंड?


भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना उद्या अर्थात 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे. सामना ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड येथील अॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियम (Adelaide Cricket Stadium) येथे खेळवला जाणार आहे.  या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. तसंच डीडी स्पोर्ट्सवरही सामन्याचं थेट प्रक्षेपण होईल.