India vs England, T20 Record : भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यात आज एक अत्यंत महत्त्वाचा सामना रंगणार आहे. टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील हा दुसरा सेमीफायनलचा सामना असल्याने दोन्ही संघासाठी आजची लढत करो या मरो अशी असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न नक्कीच करतील. दरम्यान आजवरच्या इतिहासात भारतानं काही प्रमाणात इंग्लंडवर वर्चस्व गाजवलं असलं तरी इंग्लंडनही कडवी झुंज नक्कीच दिली आहे. तर या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...


आंतरराष्ट्री टी20 क्रिकेट सामन्यांमध्ये भारत आणि इंग्लंड संघ यांच्यात आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 22 पैकी 12 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 10 सामने जिंकता आले आहेत.  


कधी, कुठे पाहाल भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल?


भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना उद्या अर्थात 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे. सामना ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड येथील अॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियम (Adelaide Cricket Stadium) येथे खेळवला जाणार आहे.  या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. तसंच डीडी स्पोर्ट्सवरही सामन्याचं थेट प्रक्षेपण होईल.




कसे आहेत टी20 विश्वचषक 2022 साठी दोन्ही संघ?




भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह


राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर 


इंग्लंडचा संघ 


जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, अॅलेक्स हेल्स.


राखीव खेळाडू : लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, टायमल मिल्स.




अशी असू शकते भारताची अंतिम 11



सलामीवीर - रोहित शर्मा, केएल राहुल 


मिडिल ऑर्डर फलंदाज - विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या


ऑलराउंडर- अक्षर पटेल, आर अश्विन


गोलंदाज - अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार


हे देखील वाचा-