ICC World Cup 2023, Prasidh Krishna: टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराउंडर उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे विश्वचषकातून (ICC World Cup 2023) बाहेर गेला आहे. हार्दिकशिवाय टीम इंडियाला सेमीफायनलचं शिवधनुष्य पेलायचं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हार्दिक ऐवजी नव्या खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे. हार्दिकऐवजी प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याची विश्वचषकाच्या (World Cup 2023) उर्वरित सामन्यांसाठी टीम इंडियात (India National Cricket Team) वर्णी लागली आहे. तसं पाहायला गेलं तर, प्रसिद्ध कृष्णाची संघातील निवडही आश्चर्यकारकच म्हणावी लागेल. कारण तो गोलंदाज आहे. दुखापतीमुळे हार्दिक स्पर्धेबाहेर पडल्यास त्याच्या जागी संघात एखाद्या अष्टपैलू खेळाडूचीच वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून परवानगी मिळाल्यानंतर या अननुभवी वेगवान गोलंदाजाचा टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला.
प्रसिद्ध कृष्णाचे रेकॉर्ड्स
प्रसिद्ध कृष्णानं टीम इंडियाकडून 17 वनडे खेळले असून या सामन्यांमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर 29 विकेट्स आहेत. 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून शेवटचा वनडे सामना खेळला होता. जिथे त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध नऊ ओव्हर्समध्ये 1/45 देऊन डेव्हिड वॉर्नरची मौल्यवान विकेट घेतली. याशिवाय कृष्णानं दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत, ज्यात त्यांच्या नावावर एकूण 4 विकेट आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रसिद्ध कृष्णा कर्नाटकातून खेळतो.
अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला टीम इंडियात स्थान मिळालं आहे. जसप्रीत बुमराहप्रमाणेच प्रसिद्धही जवळपास वर्षभर दुखापतग्रस्त होता. पण आयर्लंड दौऱ्यावरुन तो माघारी परतला. आशिया चषक स्पर्धेतही तो भारतीय क्रिकेट संघाचा सहभाग होता. विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय मालिका खेळला होता. त्यातही प्रसिद्ध कृष्णा संघाचा भाग होता.
हार्दिक पांड्या टीम इंडियाचा हुकुमी एक्का
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या विश्वचषक 2023 मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होता. पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा (Prasidh Krishna) संघात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियानं सेमीफायनल्समध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. यामध्ये ऑलराउंडर पांड्याचा सिंहाचा वाटा आहे. अशातच दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेला पांड्या सेमीफायनलपर्यंत संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुखापतीमुळे हार्दिक पांड्या विश्वचषकाचे उर्वरित सामने खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Hardik Pandya: टीम इंडियाला मोठा झटका; दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या विश्वचषकातून बाहेर