नवी दिल्ली: भारताच्या विश्वचषक विजेत्या कबड्डी संघातल्या खेळाडूंना प्रत्येकी दहा लाख रुपयांचं इनाम देण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्रालयालने केली आहे. अनुप कुमारच्या भारतीय संघानं इराणवर मात करुन सलग तिसऱ्यांदा कबड्डीचा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम नुकताच गाजवला आहे. अंतिम सामन्यात भारताने इराणचा 38-29 असा धुव्वा उडवला. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या निवासस्थानी भारतीय कबड्डी संघातल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येईल. कबड्डी खेळाडूंसह प्रशिक्षकांनाही इनाम देण्यात येईल असं विजय गोयल यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या सेहवाग आणि ब्रिटीश पत्रकार मॉर्गन पुन्हा भिडले
आवाज कुणाचा..., भारताने कबड्डी विश्वचषक जिंकला!
कबड्डी विश्वचषक: इंग्लंडचा दणदणीत पराभव, सेहवागचं 'खास' ट्वीट