नानजिंग : भारताच्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. स्पेनच्या ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मरिनने अंतिम सामन्यात सिंधूचा 21-19, 21-10 असा पराभव केला.
रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्येही सिंधूला कॅरोलिना मरिनकडूनच हार स्वीकारावी लागली होती. पण आजच्या फायनलमध्ये सिंधूने 15-11 अशी आघाडी घेऊन पहिल्या गेमवर वर्चस्व राखलं होतं. त्यानंतर कॅरोलिना मरिनने आक्रमक खेळ करून सिंधूचं वर्चस्व मोडून काढलं.
मरिनने इतक्या वेगाने गुण वसूल केले की, सिंधू तिच्यासमोर हतबल झालेली दिसली. अखेर मरिनने 21-19, 21-10 असा विजय मिळवून विजेतेपदावर जागतिक विजेतेपदावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं.
2017 च्या ग्लासगोमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधू आणि नोझोमी ओकुहारा ही जोडी अंतिम सामन्यात भिडली होती. पण त्यावेळी ओकुहाराने सिंधूचा संघर्ष तीन सेट्समध्ये मोडीत काढत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. तो पराभव बाजूला सारुन जागतिक अजिंक्यपदाच्या या स्पर्धेत भारताला पहिलंवहिलं सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी सिंधूसमोर पुन्हा एकदा चालून आली होती.
सिंधूने आजवरच्या कारकीर्दीत या स्पर्धेची तीन पदकं पटकावली आहेत. त्यात 2013 आणि 2014 साली कांस्य तर 2017 च्या रौप्यपदकाचा समावेश आहे. पण जागतिक अजिंक्यपदाच्या सोनेरी यशाने तिला वारंवार हुलकावणी दिली. त्यामुळे जिनपिंगच्या बॅडमिंटन कोर्टवर पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची तिला संधी होती.
यंदाचं वर्ष सिंधूसाठी विजेतेपदाच्या दृष्टीने निराशाजनक ठरलं. इंडिया ओपन आणि थायलंड ओपनमध्ये अंतिम फेरीत धडक मारुनही विजेतेपद तिच्यापासून केवळ एक पाऊल दूर राहीलं. अखेर पुन्हा एकदा तिला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचं उपविजेतेपद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Aug 2018 03:03 PM (IST)
स्पेनच्या ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मरिनने अंतिम सामन्यात सिंधूचा 21-19, 21-10 असा पराभव केला. रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्येही सिंधूला कॅरोलिना मरिनकडूनच हार स्वीकारावी लागली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -