मुंबई : महिला क्रिकेट विश्वचषकाचं उपविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला संघातल्या तीन खेळाडूंना राज्य सरकारने प्रत्येकी 50 लाखांचं बक्षीस जाहीर केलं. पण त्यांना खरंच बक्षिसाची रक्कम मिळणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

आतापर्यंत राज्यातल्या 123 खेळाडूंना जाहीर केलेली 5 कोटी 20 लाखांच्या बक्षिसाची रक्कम अजूनही त्या खेळाडूंना सरकारने दिली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे महिला क्रिकेटर पूनम राऊत, मोना मेश्राम आणि स्मृती मानधनाला 50 लाखांचं इनाम मिळणार का, हा प्रश्न आहे.

विश्वचषक संघातील पूनम राऊत, स्मृती मानधना, मोना मेश्राम या महाराष्ट्राच्या तीन कन्यांनी दैदिप्यमान कामगिरी करुन, संपूर्ण जगाचं लक्ष्य आपल्याकडं वेधून घेतलं. त्यांच्या कामगिरीचा गौरव करत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तिघींना 50 लाखाचं इनाम घोषित केलं.

संबंधित बातम्या

पूनम, स्मृती आणि मोनाला शाबासकी, राज्य सरकारकडून 50 लाखांचं इनाम जाहीर

शानदार कामगिरी करणाऱ्या महिला संघाचं मायदेशात जल्लोषात स्वागत

कर्णधार मिताली राजला BMW कार गिफ्ट!