नवी दिल्लीः टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात तब्बल 180 दिवसांची जम्बो सीरिज खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. सर्वच खेळाडू मायदेशात चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असताना फलंदाज चेतेश्वर पुजाराला या दौऱ्यातून वगळलं जाणार, अशी जाणकारांची माहिती आहे.

 

पुजारा पुढील सामने रणजीसाठी खेळण्याची शक्यता आहे. खराब फॉर्म आणि संथ गतीने फलंदाजी हे यामागचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात पुजाराला विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच पुजाराला वगळण्यात येण्याची शक्यता आहे.

 

वेस्ट इंडिज दौऱ्यातील खराब कामगिरी अंगलट?

वेस्ट इंडिज दौऱ्यात पुजाराला तीन कसोटी सामन्यात संधी मिळाली. यामध्ये प्रत्येकी 16, 46 आणि 62 अशी धावसंख्या पुजाराला उभारता आली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही पुजाराला काही खास कामगिरी करता आली नव्हती. या मालिकेत पुजाराने 7 सामन्यात केवळ 202 धावा केल्या होत्या. यामध्ये 77 ही सर्वोच्च धावसंख्या होती.

 

माजी कर्णधार राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर कसोटी संघात संधी मिळ्यानंतर पुजाराने धमाकेदार सुरुवात केली. मात्र सुरुवातीच्या दोन शतकांनंतर पुजाराने आतापर्यंत 22 इनिंग खेळल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी निवड समिती चांगल्या फलंदाजाची निवड करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे.