या विजयाचं रहस्य विराट कोहलीने सामन्यानंतर बोलताना सांगितलं. ''विजयाचं श्रेय न्यूझीलंडला जातं. त्यांनी तिन्हीही सामन्यांमध्ये आव्हान दिलं आणि आम्हाला आमचा सर्वोत्कृष्ट खेळ खेळण्यासाठी भाग पाडलं. अखेरच्या षटकांमध्ये सर्व जबाबदारी गोलंदाजांवर सोडली होती, जेणेकरुन त्यांना हवी तशी गोलंदाजी करता येईल. म्हणूनच मी अखेरच्या षटकांमध्येही शांत होतो'', असं विराट म्हणाला.
दरम्यान या सामन्यात विराटने वन डेतील सर्वाधिक वेगवान 9 हजार धावा पूर्ण केल्या. मात्र ''आपलं विक्रमांकडे नाही, तर विजयाकडे लक्ष असतं. त्यात चांगलं प्रदर्शन केलं तर तो बोनस असतो. या विक्रमांकडे दुर्लक्ष करणं कठीण असतं. कारण आपलं लक्ष त्याकडे जातं आणि कोणत्याही परिस्थितीत संघाला विजय मिळवून द्यायचा असतो'', असंही विराट म्हणाला.
विराटच्या वन डेत 9 हजार धावा पूर्ण
विराटने 194 इनिंगमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या. एवढ्या वेगवान 9 हजार धावा पूर्ण करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सच्या नावावर हा विक्रम होता. डिव्हीलियर्सने 205 इनिंगमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
भारतीय फलंदाजांमध्ये या यादीत माजी कर्णधार सौरव गांगुली अव्वल स्थानावर होता. गांगुलीने 228 इनिंगमध्ये 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. तर सचिन तेंडलुकरला 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 235 इनिंग खेळाव्या लागल्या होत्या. या वन डेत 113 धावांची शतकी खेळी करणारा विराट 9 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील 113 वा खेळाडू आहे.
संबंधित बातम्या :