Virat Kohli: विराट कोहली भारताऐवजी लंडनमध्ये का गेला राहायला? त्याने स्वतः ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान सांगून टाकलं
Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली गेल्या काही काळापासून लंडनमध्ये राहत आहे. त्याने अखेर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी इंग्लंड सोडून जाण्यामागील कारण उघड केले आहे.

Virat Kohli In IND vs AUS: विराट कोहली सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो शून्यावर बाद झाला. कोहली (Virat Kohli In IND vs AUS)बराच काळ लंडनमध्ये राहण्यासाठी गेला होता,तो भारत देशापासून दूर राहत होता. विराटची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुले वामिका आणि अकाय हे देखील लंडनला गेले. विराटने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे तो आता क्वचितच सामने खेळतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल बोलताना कोहलीने लंडनला जाण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.(Virat Kohli In IND vs AUS)
Virat Kohli In IND vs AUS: विराट कोहली लंडनला का गेला?
विराट कोहली हा एक पब्लिक फिगर आहे, तो बऱ्याच काळापासून त्याच्या कुटुंबासह परदेशात राहत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यानंतर, विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासह इंग्लंडला गेला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान समालोचक अॅडम गिलख्रिस्ट आणि रवी शास्त्री यांच्या मुलाखतीत विराट कोहलीने खुलासा केला की कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याला त्याच्या कुटुंबासह आणि वैयक्तिक आयुष्यासोबत वेळ घालवता आला. गेल्या १५ वर्षांत तो क्रिकेट खेळण्यापासून पूर्णपणे ब्रेक घेऊ शकला नाही, असेही विराट म्हणाला.
फॉक्स क्रिकेटवर बोलताना, भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली म्हणाला, "हो, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊन बराच काळ झाला आहे. "मला वाटतं मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊन बराच काळ लोटला आहे. मी फक्त माझं आयुष्य जगत होतो. तुम्हाला माहिती आहे, मी बरीच वर्षे फार काही करू शकलो नाही. माझ्या कुटुंबासोबत, माझ्या मुलांसोबत, माझ्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. हा एक सुंदर प्रवास होता जो मी खूप एन्जॉय केला आहे", असं विराट कोहली मॅचपूर्वी बोलताना म्हणाला.
Virat Kohli In IND vs AUS: विराट कोहलीने घेतला नाही ब्रेक
विराट कोहली पुढे म्हणाला की, खरं सांगायचे तर, गेल्या १५ ते २० वर्षांत मी जितकं क्रिकेट खेळलो आहे, त्यात मी फारसे ब्रेक घेतलेले नाहीत. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल एकत्र केले तर गेल्या १५ वर्षांत मी इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त सामने खेळलो आहे. म्हणूनच आता परत येणे खूप ताजेतवाने आहे.
Virat Kohli In IND vs AUS: विराटला खातंही उघडता आलं नाही
भारताने चौथ्या ओव्हरमध्ये रोहित शर्माच्या रूपात मोठी विकेट गमावली. रोहितने फक्त 8 धावा केल्या. विराट कोहलीची कामगिरी रोहितपेक्षाही वाईट होती. कोहलीने 8 चेंडूंचा सामना केला पण त्याला खाते उघडता आलं नाही. ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच विराट कोहली एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाला.


















