Why Jwala Gutta Breast Milk Donates : भारताला कॉमनवेल्थ आणि जागतिक स्पर्धेत अनेक पदकं जिंकून देणारी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा (Jwala Gutta) आता मैदानाबाहेरही एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने एक उपक्रम सुरू केला आहे जो खरोखरच कौतुकास्पद आहे. गेल्या चार महिन्यांपासून ती रोज सरकारी रुग्णालयात 600 मिलीलीटर ब्रेस्ट मिल्क दान करत आहे. यादरम्यान तिने जवळपास 30 लिटर दूध दान केलं असून, तिच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Continues below advertisement

गोल्ड मेडल विजेत्या ज्वाला गुट्टाची ‘आभाळमाया’; नवजातांसाठी बनली माऊली

ज्या नवजात बाळांना त्यांच्या मातांकडून दूध मिळत नाही, अशा असहाय्य बाळांसाठी ज्वाला माऊली ठरली आहे. आईच्या दुधाला ‘अमृत’ मानलं जातं. त्यातून बाळांच्या शरीराचा विकास होतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून संरक्षण मिळतं. त्यामुळे ज्वालाने केलेलं हे दान ही फक्त मदत नाही, तर शेकडो निष्पाप जीवांना दिलेली नवसंजीवनी आहे. (Why Jwala Gutta Breast Milk Donates)

Continues below advertisement

ज्वाला गुट्टावर कौतुकाचा वर्षाव

22 एप्रिल 2021 रोजी ज्वालाचा विवाह अभिनेता विष्णु विनोद (Vishnu Vinod) याच्याशी झाला होता. चार वर्षांनी ती आई बनली. आपल्या मुलीला दूध पाजल्यानंतर उरलेलं दूध ती तत्काळ रुग्णालयात दान करते. भारतात एखाद्या खेळाडूने असा उपक्रम प्रथमच हाती घेतला असून, तो सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

ज्वाला गुट्टाचा खेळाडू म्हणून प्रवास कसा होता?

ज्वाला गुट्टाचा खेळाडू म्हणून प्रवास तेजस्वी आहे. 2010 आणि 2014 च्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) मध्ये तिने भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. तिची जोडीदार अश्विनी पोनप्पा (Ashwini Ponnappa) हिच्यासह तिने अनेक ऐतिहासिक सामने जिंकले. डबल्समध्ये भारताला जागतिक दर्जा मिळवून देण्यात तिचा मोलाचा वाटा आहे. याशिवाय 2011 मध्ये तिने BWF विश्वचषक (World Championship) मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं, तर 2014 मध्ये थॉमस आणि उबेर कपमध्येही पदक जिंकत भारताचा झेंडा उंचावला.

खेळाच्या मैदानावर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करणारी ज्वाला आता मातृत्वाच्या मैदानावरही विजेती ठरली आहे. तिच्या या ‘आभाळमाये’मुळे अनेक बाळांना जीवनदान मिळत आहे आणि समाजात करुणा, संवेदना आणि जबाबदारीचं एक सुंदर उदाहरण घडत आहे.

हे ही वाचा -

IND vs PAK सामन्याची 50 टक्के तिकिटं शिल्लक, कोणीच खरेदी करेना, 2 खेळाडूंबाबत धक्कादायक दावा; नेमकं काय घडलं?