कोलकाता : चार वर्षांपूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने प्रेयसी हसीन जहासोबत संसार थाटला. मात्र तो एका क्षणातच उद्ध्वस्त झाला. या नात्यामध्ये संघर्ष निर्माण होण्यामागचं कारण कोट्यवधी रुपये किंमतीचं 'हसीन फार्म हाऊस' आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पश्चिम बंगालमधील अमरोहा येथे मोहम्मद शमीचं 150 एकरात फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसची किंमत 10 ते 12 लाख रुपये प्रती एकर या दराने जवळपास 12 ते 15 कोटी रुपये आहे. हायवेलगत असणाऱ्या या फार्म हाऊसमुळेच शमीच्या घरातला वाद रस्त्यावर आल्याची चर्चा आहे. अमरोहा हा शमीचा मूळ जिल्हा आहे.
शमीच्या कुटुंबातील सूत्रांच्या मते, फार्म हाऊस हसीन जहाच्या नावावर होतं. मात्र कागदोपत्री हसीनची भागीदारी एक रुपयाचीही नव्हती आणि हेच एक वादाचं कारण आहे. शमीला इथे स्पोर्ट्स अकादमी सुरु करायची होती. यामध्ये हसीन जहाला भागीदारी देण्यात आली नव्हती, हे वादाचं कारण असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला.
अमरोहामध्ये गुंतवणूक केल्यामुळे हसीन नाराज होती. ती ज्या भागातून आहे, तिकडे म्हणजे, कोलकाता किंवा पश्चिम बंगालच्या इतर एखाद्या भागात प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करावी, असं तिचं म्हणणं असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
कोट्यवधींच्या 'हसीन फार्म हाऊस'चा वाद शमीला नडला?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2018 10:10 PM (IST)
पश्चिम बंगालमधील अमरोहा येथे मोहम्मद शमीचं 150 एकरात फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसची किंमत 10 ते 12 लाख रुपये प्रती एकर या दराने जवळपास 12 ते 15 कोटी रुपये आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -