चेन्नई: गरज ही शोधाची जननी आहे. असं नेहमीच म्हटलं जातं आणि ते काही खोटंही नाही. त्यातूनच माणूस नवनव्या गोष्टी शिकतो. असंच काहीसं चित्र चेन्नई कसोटीआधी पाहायला मिळालं. चेन्नईत वरदा वादळामुळे चेपॉक मैदानावरील सराव करणाऱ्या खेळपट्टीचं बरंच नुकसान झालं आहे. त्यामुळे तिथं सराव करणं शक्य नसल्यानं इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटनं थेट रस्त्यावर येऊन बॅटिंगचा सराव केला.


वादळामुळे झालेल्या नुकसानानंतर तात्काळ खेळपट्टी तयार करणं शक्य नसल्यानं तामिळनाडू क्रिकेट असोसिएशननं याबाबत खेद व्यक्त केला. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानातच फिल्डिंगचा सराव केला. तर दुसरीकडे थेट रहदारी नसलेल्या रस्त्यावर येऊन जो रुटनं फलंदाजीचा सराव केला.
सिमेंटच्या रस्त्यावर येऊन टर्फ चेंडूनं पूल आणि हूक शॉट्सचा सराव केला. रुटनं बॅकफूट ड्राईव्हचाही इथं सराव केला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबीनं) आपल्या अधिकृत ट्विटर हँण्डलवरुन रुटच्या या खास सरावाचा व्हिडिओही अपलोड केला आहे.

ईसीबीनं ट्वीट केलं 'नेट्स नाही, काही काळजी नाही. रुट कुठेही सराव करु शकतो.'

दरम्यान, ईसीबीनं आपल्या ट्विटर अकाउंटवरुन तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनचं बरंच कौतुक केलं आहे. "वरदा वादळामुळे बरंच नुकसान झाल्यानंतरही मैदान पुन्हा तयार करण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे."

VIDEO: