Roger Federer Retirement: स्वित्झर्लंडचा टेनिस स्टार रॉजर फेडरर शुक्रवारी रात्री लेव्हर कप 2022 मध्ये त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. फेडररनं काही दिवसांपूर्वी स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, फेडरर लेव्हर कपच्या दुहेरी स्पर्धेत शेवटचा सामना खेळला, जिथे त्याचा जोडीदार स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल होता. मात्र, या सामन्यात त्याला विजय मिळवता आला नाही. या सामन्यानंतर सर्व खेळाडूंनी फेडररला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी फेडररसह कोर्टवर असलेला प्रत्येक खेळाडू भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 


41 वर्षीय फेडरर दिर्घकाळापासून दुखापतीशी झुंज देतोय. त्यानं त्याची शेवटची स्पर्धा विम्बल्डन 2021 मध्ये खेळली होती. फेडररनं त्याच्या कारकिर्दीत एकूण 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत आणि राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांच्यानंतर सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेत्यांच्या यादीत तो तिसरा आहे. नदालच्या नावावर 22 तर जोकोविचच्या नावावर 21 विजेतेपद आहेत. रॉजरनं 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये शेवटचे ग्रँडस्लॅम जिंकलं होतं. त्यानं जेतेपदाच्या लढतीत क्रोएशियाच्या मारिन सिलिकचा पराभव केला होता.


व्हिडिओ-






 


व्हिडिओ-






 


निवृत्तीपूर्वी रॉजर फेडररची इमोशनल पोस्ट
निवृत्तीपूर्वी रॉजर फेडररनं एक इमोशनल पोस्ट केली होती. ज्यात आपल्या निवृत्तीला दुखापती, फिटनेस आणि वयाचं कारण देत रॉजर फेडरर म्हणाला की, "मी 41 वर्षांचा आहे. मी 24 वर्षात 1500 हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिसनं मला खूप प्रेम आणि आदर दिलाय. पण आता माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपवण्याची वेळ आलीय. लंडनमध्ये पुढील आठवड्यात लेव्हर कप ही माझी शेवटची एटीपी स्पर्धा असेल. मी निःसंशयपणे भविष्यात आणखी टेनिस खेळेन पण ते ग्रँडस्लॅम किंवा टूरवर नाही."


हे देखील वाचा-