नवी दिल्लीः सव्वाशे कोटी लोकसंख्येचा भारत रिओ ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या केवळ दोनच पदकांवर सेलिब्रेशन करत आहे, किती लज्जास्पद आहे. अशी कॉमेंट ब्रिटिश पत्रकार पिअर्स मॉर्गन यांनी केली होती. त्याला माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि लेखक चेतन भगतने खास शैलीत उत्तर दिलं आहे.

https://twitter.com/piersmorgan/status/768352437166112768

भारत प्रत्येक छोट्या-मोठ्या क्षणाचा आनंद घेणारा देश आहे. क्रिकेटचा निर्माता इंग्लंडला अजून एक विश्वकप देखील जिंकता आला नाही. तरीही अजून क्रिकेट खेळत आहे. हे लज्जास्पद नाही का, अशा शब्दात विरुने षट्कार लगावला आहे.

https://twitter.com/virendersehwag/status/768444724973797376

विरुच्या अगोदर मॉर्गन यांनी चेतन भगत यांच्या टिकेचाही सामना केला आहे. चेतन भगत यांनी देखील सनसनीत उत्तर दिलं होतं. याशिवाय भारतीयांनी देखील मॉर्गनच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ट्विटरवर ज्या 77 लोकांना फॉलो करतो, त्यांपैकी मॉर्गन एक आहेत.