इंदूर कसोटीत दोन्ही डावात मिळून आर. अश्विनने न्यूझीलंडचे 13 गडी बाद केले. तर तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 27 विकेट घेतल्या. त्याच्या याच कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द सीरीज म्हणून निवडण्यात आलं. त्यानंतर वीरुनं आपल्या खास शैलीत त्याचं अभिनंदन केलं.
सेहवागने ट्वीट केलं की, 'सातव्यांदा मॅन ऑफ द सीरिजसाठी आर. अश्विनला शुभेच्छा, "फक्त लग्न झालेल्या पुरुषालाच घरी लवकर जाण्याचं महत्त्व समजू शकतं. #FamilyTime.’’
सेहवागच्या या मजेशीर ट्वीटवर आर. अश्विनची पत्नी प्रीती आणि सेहवगाची पत्नी आरतीने देखील ट्वीट केलं आहे.
भल्याभल्या फलंदाजांची विकेट काढणाऱ्या अश्विनची मात्र सेहवागने या मजेशीर ट्वीटने विकेट काढली.
दरम्यान, मालिकेतील तिसऱ्या कसोटीत भारताने न्यूझीलंडचा 321 धावांनी दणदणीत पराभव केला. तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून भारताने मालिकेत 3-0ने विजय मिळवून न्यूझीलंडला व्हॉईट वॉश दिला.