Virat Kohli : नुकत्याच संपलेल्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा किंग विराट कोहलीने दिलेल्या कडक निरोपामुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विराटने एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधून ब्रेक घेण्याच्या निर्णयाची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिली आहे. त्यामुळे उद्या (30 नोव्हेंबर) टीम इंडियाची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी घोषणा होणार आहे. यामध्ये कोहली आणि रोहितचा समावेश असणार की नाही? याकडे आता लक्ष आहे. भारत या दौऱ्यात तीन टी-20, तीन एकदिवसीय सामने आणि त्यानंतर दोन कसोटी सामने खेळणार आहे. 






इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कोहली कसोटी सामन्यांमध्ये मात्र सहभागी होणार आहे. भारताचे माजी अष्टपैलू अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समिती दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची निवड करेल. कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपमध्ये 11 डावांमध्ये 765 धावा केल्या होत्या, ज्यात तीन शतकांचा समावेश होता. त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरवण्यात आले.






कोहली सध्या लंडनमध्ये सुट्टीवर


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार “त्याने (कोहली) बीसीसीआय आणि निवड समितीला वनडेमधून विश्रांतीची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. तसेच कधी खेळायचे आहे याबद्दल तो त्यांच्याशी नंतर संपर्क साधेल. कसोटी खेळणार असल्याचे त्याने कळवलं आहे. सोबत कसोटी खेळणार असल्याचे सांगितल्याने दक्षिण आफ्रिकेतील दोन कसोटी सामन्यांसाठी निवडीसाठी उपलब्ध आहे.”  पहिली कसोटी बॉक्सिंग डेला सेंच्युरियन येथे सुरू होईल आणि दुसरी कसोटी केपटाऊन येथे होईल. कोहली सध्या लंडनमध्ये सुट्टीवर आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो नॉन-स्टॉप क्रिकेट खेळत आहे. शेवटच्या वेळी कोहलीने सप्टेंबरमध्ये विश्वचषकापूर्वी विश्रांती घेतली होती. कर्णधार रोहित शर्मासह ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती.


रोहित कोणता निर्णय घेणार? 


दुसरीकडे, कॅप्टन रोहित सुद्धा वनडे संघाच्या निवडीसाठी उपलब्ध असेल की नाही? हे स्पष्ट नाही. रोहितही विश्वचषकानंतर ब्रेकवर लंडनमध्ये आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह लवकरच रोहित आणि निवड समितीचे अध्यक्ष आगरकर यांच्याशी बोलून भविष्यातील रोडमॅपवर चर्चा करणार असल्याचे कळते. गतवर्षी कोहलीने इंग्लंड दौऱ्यानंतर विश्रांती घेतली कसा फायदा झाला याबाबत बोलला होता. 


काय म्हणाला होता कोहली?


कोहलीने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की. “10 वर्षात प्रथमच मी माझ्या बॅटला महिनाभर हात लावला नाही. मी माझ्या आयुष्यात असे कधीही केले नाही. मी अलीकडेच माझ्या तीव्रतेचा खोटा प्रयत्न करत असल्याची जाणीव झाली. ‘मी हे करू शकतो, तू स्पर्धात्मक आहेस’, तू स्वत:ला पटवून देत आहेस की तुझ्यात तीव्रता आहे पण तुझे शरीर तुला थांबण्यास सांगत आहे, तुझे मन तुला विश्रांती घेण्यास सांगत आहे आणि मागे जाण्यास सांगत आहे. आणि ते भरलेले आहे, मला समजले आहे की रवी भाई (रवी शास्त्री) यांनी काय नमूद केले आहे, त्यांनी क्रिकेटच्या व्हॉल्यूमबद्दल आणि गेल्या दहा वर्षांत मी कोणापेक्षा 40 किंवा 50 टक्के जास्त कसे खेळलो आहे याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे खूप सोपे आहे (कारण) तुम्ही तंदुरुस्त आहात, तुम्ही स्वतःवर मेहनत घेत आहात.’


कोहलीची 'विराट' कामगिरी


विश्वचषकादरम्यान कोहलीने सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांची बरोबरी तर केलीच पण विक्रमही मोडला. कोहलीने तीन शतके झळकावली. अंतिम सामन्यात 63 चेंडूत 54 धावा केल्या, हा सामना ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून जिंकला. वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कोहलीने तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या