Virat Kohli on Anushka Sharma : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली अनेकदा त्याची अभिनेत्री-पत्नी अनुष्का शर्माबद्दल खूप बोलतो. अनुष्काला एक चांगला माणूस बनवण्याचे श्रेय त्याने वारंवार दिले आहे. आता एका नवीन मुलाखतीत, क्रिकेटरने अनुष्काला भेटल्यानंतर, त्याच्या "विचारांची क्षितिजे" उघडण्यास कसे भाग पाडलं हे शेअर केलं आहे. अनुष्काला आई बनताना पाहून तिला महिलांच्या ताकदीची जाणीव झाली, असेही विराटने नमूद केले.


तर तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही 


रॉगनशी (Wrogn) बोलताना, कोहलीने म्हणाला की, अनुष्काने त्याला सत्याच्या बाजूने उभे राहण्यास आणि "स्वतःला धरून राहण्यास" शिकवलं आहे, जरी कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवण्यास किंवा तुमचे म्हणणे ऐकण्यास तयार नसतानाही. तो पुढे म्हणाला, “ती (अनुष्का) मला नेहमी म्हणाली की तू सत्याच्या बाजूने उभा आहेस, तर तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही कारण मार्ग स्वतःच कोरला जाईल आणि गोष्टी नेहमी स्वच्छ आणि विभक्त राहतील.” 






कोहली पुढे म्हणतो, तो आणि त्याची पत्नी दररोज 'चांगले' होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण तो पुढे म्हणाला की, “आम्ही दोन व्यक्ती म्हणून भेटलो आणि आम्ही अशा स्थितीत आलो आहोत जिथे आम्ही लोक म्हणून वाढत आहोत, व्यक्तिमत्त्व आणि ओळख त्वरीत कमी होत आहे.  हा एक आशीर्वाद आहे की आम्ही दररोज चांगले बनण्याचा सतत प्रयत्न करत असतो.”


दरम्यान, अनुष्का आणि विराटने दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये लग्न केले. जानेवारी 2021 मध्ये कोहली आणि अनुष्का मुलगी वामिकाचे पालक झाले. अनुष्काला आई बनताना पाहून क्रिकेटरला समजले की महिला किती मजबूत असतात. तो म्हणाला की, “तिला आई बनताना पाहणे आश्चर्यकारक होते पण आई बनण्यासाठी काय करावे लागते हेही मी पाहिले. तिने ज्याप्रकारे सर्व काही हाताळले. त्या दरम्यान तिने एक संपूर्ण चित्रपट शूट केला आहे, ते आश्चर्यचकित करणारे आहे. तेव्हाच तुम्हाला स्त्रीची ताकद नीट कळते.”


कोहली सध्या 2023 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये व्यग्र आहे. अनुष्का भारतीय क्रिकेटपटू झूलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित चकडा एक्सप्रेस या स्पोर्ट्स ड्रामाच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या