टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची अकरा वर्षे पूर्ण केली आहे. विराटनं 18 ऑगस्ट 2008 रोजी श्रीलंकेविरुद्धच्या दम्बुला वन डेत खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याला काल अकरा वर्ष पूर्ण झाली.
या अकरा वर्षांत बजावलेल्या कामगिरीसाठी भारतीय कर्णधारानं खास ट्विट करून देवाचे आभार मानले आहेत. अकरा वर्षांच्या कारकीर्दीत एवढी मोठी कामगिरी बजावू शकू, याचा आपण स्वप्नातही विचार केला नव्हता, असं विराटनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भारतीय कर्णधारानं या ट्विटमध्ये आपल्या चाहत्यांनाही त्यांची स्वप्नं साकार व्हावीत यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच आपलं लक्ष्य गाठण्यासाठी नेहमी योग्य मार्गानं वाटचाल करण्याचा सल्लाही त्यानं दिला आहे.विराटनं अकरा वर्षांच्या कालावधीत एक सर्वोत्तम फलंदाज ते सर्वोत्तम कर्णधार अशी मोठी झेप घेतली आहे. 2008 साली भारताला अंडर-19चा विश्वचषक जिंकून दिल्यानंतर विराट कोहली नावाचा एक नवा नायक भारतीय क्रिकेटला मिळाला. त्यानंतर विराटला सेहवागच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवलं. आणि त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलंच नाही.
विराटनं आजवर 239 वन डे, 77 कसोटी आणि 70 आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं 386 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 56.33 च्या सरासरीनं 20 हजार 502 धावांचा रतीब घातला आहे. त्यात तब्बल 68 शतकं आणि 95 अर्धशतकांचा समावेश आहे. या अकरा वर्षात त्यानं विक्रमांचे अनेक इमलेही उभारले आहेत.
2016 साली महेंद्रसिंग धोनीकडून कर्णधारपद स्वीकारल्यानंतर विराटनं भारतीय क्रिकेटला आणखी उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या काळात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेसारख्या मातब्बर संघांना टीम इंडियानं पराभवाची धूळ चारली.

विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये केलेली कामगिरी:
46 कसोटी : 26 विजय, 10 पराभव
80 वन डे : 58 विजय, 19 पराभव
25 टी20 : 15 विजय, 9 पराभव