राजकोट : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने काल 28 वा वाढदिवस साजरा केला. टीम इंडियाच्या सदस्यांनी राजकोटमध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासह सर्व खेळाडू उपस्थित होते. अजिंक्य रहाणे, उमेश यादव, हार्दिक पांड्या यांनी विराटला केक भरवला. त्यानंतर सर्वांनी मिळून विराटच्या चेहऱ्याला केक लावला. विराटने सर्वप्रथम प्रशिक्षक अनिल कुंबळेंना केक भरवला. https://twitter.com/cheteshwar1/status/794902912916799488 चेतेश्वर पुजारानेही विराटसोबतचा फोटो शेअर केला आहे. तर टीम इंडियाकडून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पाहा व्हिडिओ :