मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार केला. विराटने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या साऊदम्प्टन कसोटीत अँडरसनच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत सहा हजार कसोटी धावा पूर्ण केल्या. या कामगिरीसह विराट कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा करणारा भारताचा दहावा फलंदाज ठरला आहे. तर सर्वात जलद सहा हजार धावा करणारा सुनील गावस्कर यांच्यानंतरचा दुसरा भारतीय ठरला. गावस्कर यांनी 117 डावांत सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. विराटने 70 कसोटी सामन्यांतल्या 119 डावांत ही कामगिरी करुन दाखवली. कसोटी क्रिकेटमध्ये जलद सहा हजार धावा पूर्ण करणारे भारतीय फलंदाज : सुनील गावस्कर – 117 डाव विराट कोहली – 119 डाव सचिन तेंडुलकर – 120 डाव वीरेंद्र सेहवाग – 123 डाव राहुल द्रविड – 125 डाव