शिमला: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धरमशाला कसोटीत खेळू शकत नाही. मात्र विराट कोहली तरीही टीम इंडियासाठी मैदानात उतरला.

यावेळी कोहली संघातील खेळाडू म्हणून नव्हे तर चक्क वॉटर बॉय म्हणून मैदानात उतरला.

एखाद्या सामन्यात खेळत नसताना स्वत: कर्णधाराने मैदानात जाऊन खेळाडूंना पाणी देण्याचा हा दुर्मिळातील दुर्मिळ असा क्षण आहे.

संघातील राखीव खेळाडू हे ब्रेकमध्ये खेळाडूंना आवश्यक त्या सर्व गोष्टी जसे की पाणी, कोल्ड्रिंक्स, फळं, घाम पुसण्यासाठी टॉवेल-नॅपकीन वगैरे घेऊन जातात. संघातील वरिष्ठ खेळाडूंना हे काम लावत नाहीत. अर्थात प्रत्येक खेळाडूची सुरुवात या कामानेच होते, मात्र आज स्वत: कोहलीने दाखवलेलं त्याचं 'डेडिकेशन' निश्चितच कौतुकास्पद आहे.

उमेश यादवने सलामीवीर मॅट रेनशॉला माघारी धाडलं, त्यावेळी मैदानातील भारतीय खेळाडूंना स्वत: कोहली पाणी घेऊन गेला.

त्यानंतर त्याने सीमारेषेजवळही नवोदित फिरकीपटू कुलदीप यादवशीही सल्ला-मसलत केली. त्यानंतर कुलदीपने कांगारुंना आपल्या जाळ्यात अडकवलं.

https://twitter.com/ijenishpatel/status/845566529064390656

या समर्पित वृत्तीनंतर सोशल मीडियावर कोहलीवर स्तुतीसुमनं उधळली जात आहेत.

https://twitter.com/rohitkr277/status/845560925948203009

https://twitter.com/sabtrolled/status/845559717527216128

https://twitter.com/atuljadhav189/status/845559506272731137