Virat Kohli Anushka Sharma Dance: विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचा आरसीबीच्या चॅम्पियनशिप आफ्टर पार्टीतील डान्स व्हिडीओ (RCB Championship) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कुटुंबीयांसोबत या कपलने विजयाचा जल्लोष साजरा केला.
रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूने (Royal challengers Bengaluru) रविवारी गुजरात टायटन्स( Gujarat Titans) विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर 156 धावांचे लक्ष्य सहज पार करत पाच विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने सलग दुसरे आयपीएल विजेतेपद पटकावले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा पांढरा शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसत असून ती विराटचा व्हिडीओ शूट करताना दिसते. तर विराट कोहली टीमसोबत डान्स करताना आणि प्रशिक्षक दिनेश कार्तिकसोबत ठेका धरताना दिसला.
विराटच्या डान्ससोबतच त्याच्या टी-शर्टचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. पोस्ट-मॅच सेलिब्रेशनदरम्यान त्याने “One felt nice, we did twice” असा मजकूर असलेला टी-शर्ट घातला होता.
Anushka Sharma Post: अनुष्काची विराटसाठी खास पोस्ट
दरम्यान, आरसीबीच्या विजयानंतर अनुष्काने इन्स्टाग्रामवर विराटसाठी खास पोस्ट शेअर केली. विराटचा तोच व्हायरल टी-शर्ट घातलेला फोटो शेअर करत तिने हार्ट इमोजी पोस्ट केला. सामना जिंकल्यानंतर अनुष्का VIP स्टँडमध्ये उभी राहून टाळ्या वाजवत आनंद साजरा करताना दिसली. मैदानावरून विराटने तिला फ्लाइंग किस दिला, त्यावर अनुष्काही आनंदाने हसताना दिसली. या क्षणाला चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.
सामन्यात विराट कोहलीने अवघ्या 25 चेंडूंमध्ये आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने 42 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आणि सामनावीराचा मान पटकावला. त्याच्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे आयपीएल प्ले-ऑफमधील ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली. कोहलीसाठी हा हंगामही शानदार ठरला. त्याने आयपीएल 2026 मध्ये एकूण 675 धावा केल्या. विशेष म्हणजे सलग चौथ्या हंगामात त्याने 600 पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला. या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो वैभव सूर्यवंशी, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या पाठोपाठ चौथ्या स्थानावर राहिला.
