मुंबई: टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी करार वाढवण्यास नकार देत, पदावरुन पायउतार होणं पसंत केलं. मात्र आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी कर्णधार विराट कोहलीकडे बोट ठेवलं. टीम इंडियाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप असल्याचा आरोप त्यांनी पायउतार होताना केला आहे. यानंतर आता टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कुंबळेची बाजू घेतली आहे. अनिल कुंबळेसारख्या कडक शिस्तीच्या पण रिझल्ट देणाऱ्या प्रशिक्षकाला जो कोणी विरोध करतोय, त्याची टीममधून हकालपट्टी करा, असा आक्रमक पवित्रा टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी घेतला. हा सर्व प्रकार सुरु असताना अद्याप विराट कोहली गप्प का, असा सवाल त्याचे चाहते उपस्थित करत आहेत. विराट कोहली भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेला शुक्रवार 23 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. याबाबत विराट त्याची बाजू मांडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे? कुंबळेसारख्या प्रशिक्षकाला विरोध करणाऱ्या खेळाडूला हाकला: गावसकर  अनिल कुंबळेसारख्या कडक शिस्तीच्या पण रिझल्ट देणाऱ्या प्रशिक्षकाला जो कोणी विरोध करतोय, त्याची टीममधून हकालपट्टी करा, असा आक्रमक पवित्रा घेत टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी थेट विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. “तुम्हाला सरावात सूट देणारा, सुट्टी देणारा, शॉपिंगला जाऊ देणारा प्रशिक्षक हवा आहे” असा टोला सुनील गावसकर यांनी लगावला. इतकंच नाही तर अनिल कुंबळेसारखा रिझल्ट देणारा, कडक शिस्तीचा प्रशिक्षक ज्याला नको आहे, त्या खेळाडूला संघातून हाकलायला हवं, असा आक्रमक पवित्राही गावसकर यांनी केली. संबंधित बातम्या अनिल कुंबळेचं राजीनामा पत्र जसंच्या तसं पाकिस्तानच्या अझर अलीकडून कोहली, धोनी, युवराजचे आभार!  'बाप कौन है' म्हणणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला मैदानाबाहेर चोपलं!  पाकिस्तानी खेळाडू मालामाल, रोख रकमेसह जमिनीही इनाम