विशाखापट्टणम : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विशाखापट्टणम वन डेत आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला आहे. त्याने वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला ओलांडला आहे. ही कामगिरी बजावणारा विराट हा सचिन, गांगुली, द्रविड आणि धोनी यांच्यानंतरचा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.
विशेष म्हणजे वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात सर्वात जलद दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. सचिनने वन डेत 259 व्या डावात दहा हजार धावांचा पल्ला ओलांडला होता. विराट कोहलीने ती कामगिरी 204 व्या डावातच बजावली आहे.
दरम्यान, विराट कोहली वन डेत वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. 29 डावांमध्ये त्याने 1574* धावा केल्या आहेत. विराटने सचिनचा 39 डावांमध्ये 1573 धावांचा विक्रम मागे टाकला.
वन डेत सर्वाधिक वेगवान दहा हजार धावा
विराट कोहली - 204 इनिंग
सचिन तेंडुलकर – 259 इनिंग
सौरव गांगुली – 263 इनिंग
रिकी पाँटिंग – 266 इनिंग
जॅक कॅलिस – 272
महेंद्र सिंह धोनी - 273
राहुल द्रविड - 279
वन डेत दहा हजारांपेक्षा जास्त धावा करणारे क्रिकेटर
सचिन तेंडुलकर – 18426
कुमार संगकारा – 14234
रिकी पाँटिंग – 13704
सनथ जयसूर्या – 13430
महेला जयवर्धने – 12650
इंझमाम उल हक – 11739
जॅक कॅलिस – 11579
सौरव गांगुली – 11363
राहुल द्रविड – 10889
ब्रायन लारा – 10405
तिलकरत्ने दिलशान – 10290
महेंद्र सिंह धोनी - 10124*
वन डेत विराटच्या सर्वात वेगवान दहा हजार धावा, सचिनचाही विक्रम मोडला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Oct 2018 04:11 PM (IST)
ही कामगिरी बजावणारा विराट हा सचिन, गांगुली, द्रविड आणि धोनी यांच्यानंतरचा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर सर्वात वेगवान दहा हजार धावा पूर्ण करणारा तो सचिननंतर पहिलाच फलंदाज ठरला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -