कोलकाता : सलग सात डावांमध्ये अर्धशतक झळकवून विश्वविक्रमाची बरोबरी करणारा टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुल श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण हा देखील एक आगळावेगळा विक्रम आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद होणारा राहुल हा भारताचा सहावा फलंदाज ठरला आहे.
एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारताचा सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर तब्बल तीन वेळा कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. भारताचे एकूण 6 खेळाडू पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत.
केएल राहुलआधी 2007 साली वसीम जाफर बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.
मागील वर्षी श्रीलंकेच्या करुणारत्नेला ऑस्टेलियाच्या मिचेल स्टार्कनं पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं.